वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या चर्मोद्योगाने जगात पहिले स्थान मिळवण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे- पियुष गोयल


2025 पर्यंत 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक चामड्याच्या निर्यातीचे लक्ष्य आपण ठेवू शकतो - गोयल

एकट्या कोल्हापुरी चपला  1 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करू शकतात”:  गोयल

Posted On: 17 NOV 2021 9:08PM by PIB Mumbai

 

भारताच्या  चर्मोद्योगाने जगात पहिले स्थान मिळवण्याची  आकांक्षा बाळगली पाहिजे असे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी म्हटले आहे.  आज नवी दिल्लीत चामडे निर्यात परिषदेच्या (सीएलई)  राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्रदान  समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, आपला   चर्मोद्योग जगात दुसऱ्या क्रमांकावर  आहे.

मला खूप समाधान वाटत आहे की तुम्ही 2025 पर्यंत किमान 10 अब्ज डॉलर्स पर्यंत वृद्धीची आकांक्षा बाळगत आहात, यातून  तुम्हाला केवळ 15-17% वाढीचा दर मिळतो. तेव्हा  तुमची  सर्वांची क्षमता पाहतामला वाटते की आपण  आणखी महत्त्वाकांक्षी लक्ष्ये ठेवू शकतो,  गोयल म्हणाले की, एकट्या कोल्हापुरी चपलाच 1 अब्ज डॉलर्स निर्यातीचे लक्ष्य गाठू शकतात.

चामडे निर्मिती समूहाच्या आसपासच्या परिसरात बीआयएस मानक प्रयोगशाळा उभारून  सरकार चामडे  उद्योगाला उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

गोयल म्हणाले की, भारताच्या चर्मोद्योगात इतर जगाच्या तुलनेत स्पर्धात्मक आणि तुलनात्मक फायदे आहेत आणि मेड इन इंडियाब्रँड उत्कृष्टतेचा ब्रँड बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट  आहे.

या मेळाव्याला संबोधित करताना वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री  अनुप्रिया पटेल यांनी चर्मोद्योगाला  त्यांच्या संशोधनात्मक उपक्रमांसाठी  सरकारकडून  मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी मंत्र्यांच्या हस्ते 2019-20 आणि 2020-21 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772758)
Read this release in: English , Urdu , Hindi