सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह ईशान्य  एमएसएमई परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार

Posted On: 17 NOV 2021 5:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे गुवाहाटी येथे उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर, 2021 रोजी हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह ईशान्य एमएसएमई परिषदेचे अध्यक्षस्थापद भूषवतील. यावेळी सर्व ईशान्येकडील राज्यांचे वरिष्ठ मंत्री आणि मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. ही परिषद एमएसएमई मंत्रालयाने आयोजित केली आहे आणि ईशान्य प्रदेशातील एमएसएमईसाठी उद्योजकता आणि व्यापार संधींना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.

रोजगार निर्मिती आणि उत्पादन पाया विस्तारण्याच्या दृष्टीने एमएसएमई क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सध्या, यामध्ये 11 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या 6 कोटींहून अधिक कंपन्या आहेत. तसेच या क्षेत्राचे जीडीपीमध्ये 30% पेक्षा जास्त आणि भारतातील एकूण निर्यातीत 49% पेक्षा जास्त योगदान आहे.

जेव्हा आपण ईशान्य प्रदेशचा विकास करू तेव्हाच भारताचा विकास होऊ शकतो आणि याला एमएसएमई मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

बदललेल्या आर्थिक परिस्थितीत उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांमध्ये अशा प्रकारच्या परिषदा ईशान्य प्रदेशला मदत करतील.

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772645) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu