गृह मंत्रालय
त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील एका मशिदीचे नुकसान झाल्यासंदर्भातल्या सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या आणि तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन करणाऱ्या आहेत
लोकांनी शांतता राखावी आणि अशा बातम्यांमुळे दिशाभूल होऊ देऊ नये
प्रविष्टि तिथि:
13 NOV 2021 10:37PM by PIB Mumbai
त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील काकराबन भागातील एका मशिदीचे नुकसान आणि मोडतोड झाल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्या खोट्या असून यात तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन केले आहे. काकराबन येथील दर्गाबाजार भागातील मशिदीचे कोणतेही नुकसान झालेले नाही आणि गोमती जिल्ह्यातील त्रिपुरा पोलीस शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहेत.
अलीकडच्या काळात त्रिपुरातील कोणत्याही मशिदीच्या संरचनेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोप केल्याप्रमाणे या घटनांमध्ये साधी किंवा गंभीर दुखापत किंवा बलात्कार किंवा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही.
लोकांनी शांतता राखावी आणि अशा खोट्या बातम्यांमुळे दिशाभूल होऊ देऊ नये. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात त्रिपुरासंदर्भातील खोट्या बातम्यांच्या आधारे हिंसाचार तसेच शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने काही अयोग्य वक्तव्ये झाल्याचे वृत्त आहे. हे अतिशय चिंताजनक असून कोणत्याही परिस्थितीत शांतता राखली जावी असे आवाहन करण्यात आले आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1771562)
आगंतुक पटल : 437