इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया’ (एनआयएक्सआय) च्यावतीने ग्राहकांच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असणारे 'ग्राहक सेवा केंद्र'


या उपक्रमामुळे ग्राहकांचा संवाद सुलक्ष होऊन, कार्यक्षमता वाढवणे शक्य होणार: एनआयएक्सआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार जैन

Posted On: 12 NOV 2021 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021

एनआयएक्सआय म्हणजेच नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया’ च्या वतीने ग्राहकांच्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या ग्राहक सेवा केंद्राची स्थापना केली आहे. ग्राहकांना समर्पित या उपक्रमामुळे इंटरनेट व्यवहाराविषयी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी ग्राहकांबरोबर संवाद साधणे सुकर जाणार आहे. या सेवा केंद्रातील टीम इंटरनेटच्या सर्व ऑपरेशन्सविषयी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिवसाचे चोवीस तास उपलब्ध असणार आहे.

एनआयएक्सआय तीन व्यवसायांसाठी कार्यरत आहे. यामध्ये इंटरनेट एक्सचेंज, डॉट इन रजिस्ट्री आणि आयआरआयएनएन यांचा समावेश आहे. या तीनही विभागामार्फत वेगवेगळ्या ग्राहकांशी त्यांचे व्यवहार होत असतात. त्यांच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे तसेच आपल्या ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र स्थापण्यात आले आहे. बऱ्याचदा ग्राहक एनआयएक्सआयच्या दोन वेगवेगळ्या विभागांकडून सेवा घेत असतात. अशावेळी ते दोन्हीकडे आपल्या कामासंदर्भात संपर्क साधत असतात. यामुळे वेळेचा अपव्यय होतो, यावर मात करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, सुलभतेने सेवा देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

एनआयएक्सआयच्या ग्राहकांना पुढील फोन क्रमांकावर संपर्क साधून किंवा पत्त्यावर ईमेल करून सेवा घेता येणार आहे. .

फोन - 011-48202001

ईमेल - customercare@nixi.in

एनआयएक्सआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार जैन यावेळी म्हणाले की, भारतीय इंटरनेट समुदायाला चांगली सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो, त्यासाठीच या ग्राहक दक्षता विभागाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना ऑन बोर्डिंगपासून ते बाहेर पडेपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत करणे शक्य होणार आहे. हा उपक्रम ग्राहकांबरोबर सुलभतेने संवाद प्रस्थापित करण्यासाठी उपुयक्त ठरणार असून सेवा अधिक कार्यक्षमतेने देणे शक्य होणार आहे.

निक्सि अर्थात एनआयएक्सआय या संस्थेविषयी -

‘नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया’(एनआयएक्सआय) ‘निक्सि’ही संस्था ना नफा तत्वावरील संस्था असून (कंपनी कायदा 2013-कलम 8 ) 2003 पासून कार्यरत आहे. भारतामध्ये इंटरनेटविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचा प्रसार करण्यासाठी कार्य करीत आहे. भारतीयांसाठी इंटरनेटसंबंधातील विविध कामे या संस्थेमार्फत  केली जातात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

1. इंटरनेट एक्सचेंजच्या माध्यमातून आयएसपी, डेटा केंद्र आणि सीडीएनमध्ये इंटरनेट डेटाची देवाणघेवाण केली जाते.

2. आयइन देश-कोड डोमेनची नोंदणी, व्यवस्थापन आणि व्यवहार करणे. भारतासाठी भारत आयडीएन डोमेन.

3. आयआरआयएनएन, इंटरनेट कार्य शिष्टाचाराचे व्यवस्थापन आणि संचालन (IPv4/IPv6).

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1771308) Visitor Counter : 247


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi