संरक्षण मंत्रालय
दुबई एयर शो 2021 मध्ये भारतीय हवाई दलाच्या पथकाचा समावेश
Posted On:
10 NOV 2021 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021
अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 ते 18 नोव्हेंबर 21 या कालावधीत आयोजित द्विवार्षिक दुबई हवाई प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त अरब अमिराती सरकारने सारंग आणि सूर्यकिरण विमानांच्या हवाई प्रात्यक्षिक तुकड्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. या तुकड्या सौदी हॉक्स, रशियन नाईट्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अल फुरसान यासह जगातील काही सर्वोत्कृष्ट संघांसह प्रात्यक्षिके सादर करतील. याव्यतिरिक्त, भारतीय हवाई दलाचे हलके लढाऊ विमान (LCA) तेजस हेही प्रात्यक्षिकांमध्ये आणि जागेवर उभ्या केलेल्या विमानांच्या प्रदर्शनात सहभागी होईल.
सारंग संघाची पाच प्रगत हलकी हेलिकॉप्टर (ALH) ध्रुव, सूर्यकिरण संघाची 10 BAE हॉक 132 आणि तीन LCA तेजस 09 नोव्हेंबर 21 पर्यंत समावेशासाठी सज्ज झाली. आगमनानंतर, यूएई सशस्त्र दलाचे स्टाफ मेजर जनरल स्टाफ पायलट इशाक सालेह मोहम्मद अल-बालुशी आणि यूएई हवाई दलाच्या इतर अधिकाऱ्यांनी संघाचे स्वागत केले. 14 नोव्हेंबर 21 रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी या तुकड्या आता तयारी करत आहेत.
सारंग संघाने यापूर्वी 2005 मध्ये संयुक्त अरब अमिरातीतील अल ऐन ग्रांप्रीमध्ये भाग घेतला होता, तर दुबई एअर शो ही सूर्यकिरण आणि तेजस यांच्यासाठी डोळ्यांची पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर करण्याची पहिलीच संधी असेल.
08DU.jpg)
S.Patil/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770724)
Visitor Counter : 279