कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

चालू आर्थिक वर्षात नॉन कोकिंग कोळशाच्या आयातीत लक्षणीय घट

Posted On: 09 NOV 2021 8:01PM by PIB Mumbai

 

देशातील कोळशाची गरज आणि देशांतर्गत उत्पादन यातील तफावत भरून काढण्यासाठी भारत कोळशाची आयात करतो.  प्रामुख्याने पोलाद क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कोकिंग कोळशाच्या आयातीवरील अवलंबत्व हे प्रामुख्याने  मर्यादित देशांतर्गत उपलब्धतेमुळे आहे. त्यामुळे , या श्रेणीतील आयातीला फारसा पर्याय नाही. कोकिंग कोळशाच्या आयातीला पर्याय नसला   तरीही, सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि   आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने, चालू आर्थिक वर्षात नॉन-कोकिंग कोळशाच्या विविध प्रकारच्या आयातीत लक्षणीय घट झाली आहे. यातील उच्च जीसीव्ही औष्णिक   कोळसा औद्योगिक हेतूसाठी  वापरला जातो आणि कमी जीसीव्हीचा  वीज निर्मितीसाठी वापरला जातो.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजे ऑगस्ट 2021 पर्यंत , नॉन कोकिंग कोळशाच्या सर्व प्रकारांची आयात मागील वर्षाच्या याच कालावधीतील 84.44 मेट्रिक टनच्या तुलनेत  सुमारे 16.09% म्हणजेच 70.85 मेट्रिक टन इतकी कमी झाली आहे.  कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे या वर्षात औद्योगिक उत्पादनावर गंभीर परिणाम झाल्यामुळे 2020- 21 हे आर्थिक वर्ष तुलनात्मक हेतूसाठी धरले जात नाही , त्या वर्षात   21% घट आढळली आहे.

प्रामुख्याने  ऊर्जा क्षेत्रात वापरल्या जाणार्या  कमी उष्मांक मूल्याच्या (कमी GCV) नॉन कोकिंग  कोळशाच्या आयातीत झालेली घट अधिक लक्षणीय आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये  ऑगस्ट 21पर्यंत, अशा प्रकारच्या  कोळशाची आयात  आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच कालावधीतल्या  28.69 मेट्रिक टन वरून सुमारे 47% कमी होऊन 15.24 मेट्रिक टन इतकी झाली आहे. चालू वर्षात नॉन कोकिंग कोळशाच्या आयातीत लक्षणीय घट झाल्यामुळे, कोळशाची एकूण आयात देखील एप्रिल ते ऑगस्ट 2021 या कालावधीत सुमारे 12% म्हणजेच 94.15 मेट्रिक टन पर्यंत  कमी झाली आहे,जी  आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच कालावधीत 107.01 मेट्रिक टन इतकी  होती. . यामुळे चालू वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत झाली आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.

कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा  आणखी वाढवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोल इंडिया लिमिटेड आणि इतर कोळसा उत्पादक   देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सज्ज आहेत.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1770378) Visitor Counter : 242


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali