आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 108.21 कोटींहून अधिक


भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.24%, मार्च 2020 पासून सर्वोच्च दर

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 10,853 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 1,44,845 असून ही गेल्या 260 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.28%) गेल्या 44 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

Posted On: 07 NOV 2021 9:35AM by PIB Mumbai

भारतात गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 20,75,942 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 108.21 कोटीपेक्षा अधिक (1,08,21,66,365) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,03,62,667 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्याआकडेवारीनुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

 

HCWs

1st Dose

1,03,79,576

2nd Dose

92,63,326

 

FLWs

1st Dose

1,83,72,573

2nd Dose

1,60,27,565

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,39,18,322

2nd Dose

15,03,76,212

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,62,24,682

2nd Dose

9,89,98,585

 

Over 60 years

1st Dose

11,05,34,942

2nd Dose

6,80,70,582

Total

1,08,21,66

गेल्या 24 तासात 12,432 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,37,49,900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  

परिणामी, कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.24% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.  

सलग 133 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 गेल्या 24 तासात 10,853 नव्या रूग्णांची नोंद झाली. 

सध्या सक्रीय रुग्णसंख्या 1,44,845 इतकी असून ही संख्या गेल्या 260 दिवसातली सर्वात कमी आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.42% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्याकरण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 9,19,996 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.48 कोटीहून अधिक (61,48,85,747) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.28 % असून, गेले 44 दिवस हा दर सातत्याने 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.18% असून गेले 34 दिवस 2% पेक्षा कमी आणि 69 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

 ***

RadhikaA/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1769832) Visitor Counter : 193