आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 107.92 कोटीहून अधिक


देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.23%, मार्च 2020 पासून सर्वात उच्च स्तरावर

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 10,929 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 1,46,950, गेल्या 255 दिवसांपासून सर्वात कमी

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.27%) गेल्या 43 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

Posted On: 06 NOV 2021 9:48AM by PIB Mumbai

देशभरात गेल्या 24 तासात 20,75,942 कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 107.92 कोटीपेक्षा अधिक (1,07,92,19,546) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,09,36,027 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

 

HCWs

1st Dose

1,03,79,530

2nd Dose

92,56,225

 

FLWs

1st Dose

1,83,72,402

2nd Dose

1,60,12,003

 

Age Group 18-44 years

1st Dose

42,33,49,812

2nd Dose

14,89,38,412

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,60,88,375

2nd Dose

9,85,40,180

 

Over 60 years

1st Dose

11,04,55,016

2nd Dose

6,78,27,591

Total

1,07,92,19,546

गेल्या 24 तासात 12,509 रुग्ण कोविड मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,37,37,468 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. 

परीणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.23% झाला आहे.

 

सलग 132 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 10,729 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,46,950 इतकी असून , गेल्या 255 दिवसांपासून सर्वात कमी. देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.43% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशात गेल्या 24 तासात 8,10,783 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.39 कोटीहून अधिक (61,39,65,751) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.27% असून गेले 43 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.35% असून गेले 33 दिवस 2% पेक्षा कमी आणि 68 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1769703) Visitor Counter : 205