इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
“सर्वाधिक फायदेशीर थ्रीडी प्रिंटिंग व्यवसाय” विषयक भव्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरु
अर्जाची शेवटची तारीख आहे 6 नोव्हेंबर 2021
Posted On:
05 NOV 2021 6:10PM by PIB Mumbai
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अतिरिक्त उत्पादन उत्कृष्टता केंद्राने (CoE AM) “सर्वाधिक फायदेशीर थ्रीडी प्रिंटिंग व्यवसाय” यावरील भव्य स्पर्धेसाठी अर्ज मागवले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2021.
भारतात खेळणी उत्पादक खेळणी बनवण्यासाठी साच्यांचे प्रकार आणि तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीची किंमत यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. खेळण्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत, मनुष्यबळाचा खर्च यामुळे भारतीय खेळणी उत्पादक बाजारपेठेत मागे राहतात. वेगवेगळे साचे वापरण्यासाठी येणारा खर्च , बदलत राहणारी बाजारपेठ, आणि यंत्रसामग्रीवर होणारा खर्च यावर मात करण्याच्या करण्याच्या दृष्टीने थ्रीडी प्रिंटिंग हा आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय महत्वाचा आहे. म्हणूनच आर्थिक दृष्ट्या किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या हेतूने CoEAM ने थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून डिजिटल खेळणी तयार करण्याच्या व्यवसायासाठी एक भव्य स्पर्धा आयोजित केली आहे.
"थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून डिजिटल खेळणी बनवणाऱ्या सर्वाधिक यशस्वी व्यवसायाचा नमुना" या संशोधनात्मक विषयाचे फलित शोधण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होईल.
ही स्पर्धा दोन भागात असेल. यातील पहिला भाग म्हणजे फ्यूज डिपॉझिट मॉडेलिंग (FDM) किंवा डिजिटल लाईट प्रोसेसिंग (DLP) वापरून थ्रीडी प्रिंटींगचे मूळ नमुने तयार करणे आणि दुसरा भाग म्हणजे या नमुन्याबरहुकूम व्यवसायाचा नमुना तयार करणे.
अधिक माहितीसाठी https://www.meity.gov.in/grand-challenge-most-profitable-3d-printing-business येथे भेट द्या.
***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769620)