विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून  त्यांना  प्रोत्साहन देईल: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2021 8:42PM by PIB Mumbai

 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन देईल, अशी घोषणा  विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागावाचे  केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)डॉ. जितेंद्र सिंह यांनी,मोहाली येथील राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था (एनएबीआय ) येथे आज अत्याधुनिक  650 टेराफ्लॉप सुपरकंप्युटिंग सुविधेचे उद्घाटन करताना केली.  नवीन सुपरकंप्युटिंग सुविधा ही  टेलिमेडिसीन, डिजिटल हेल्थ, एम हेल्थ सह बिग डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन  आणि इतर तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात काम करणार्‍या या स्टार्ट-अप्ससाठी  सुविधा प्रदान करेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेबद्दल बोलताना  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, पुण्याच्या सी-डॅक च्या सहकार्याने राष्ट्रीय   सुपरकंप्युटिंग   अभियान  (एनएसएम ) अंतर्गत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.ही उच्च श्रेणीची सुविधा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिनोमिक्स, कार्यात्मक  जिनोमिक्स,रचनात्मक  जीनोमिक्स आणि लोकसंख्येच्या  अभ्यासातून संकलित  होणाऱ्या बीआयजी डेटाच्या विश्लेषणासाठी वरदान ठरेल, असे मंत्री म्हणाले.

मंत्र्यांनी सांगितले की, अंदाजे 20 कोटी रुपये खर्चाने स्थापन केलेली  ही 650 टेराफ्लॉप   सुपरकंप्युटिंग  सुविधा, कृषी आणि पोषण  जैव तंत्रज्ञानाशी संबंधित संस्थेतील  आंतरविद्याशाखीय अत्याधुनिक संशोधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक अनोखी सुविधा असेल.

उद्घाटनानंतर डॉ.जितेंद्र सिंग  यांनी डिजिटल इंडियाउपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय कृषी-अन्न जैवतंत्रज्ञान संस्था आणि नाविन्यपूर्ण आणि उपयोजित जैव प्रक्रिया केंद्र येथे नॅबी - लॅबीफाय (NABI-Labify) आणि ई-ऑफिस या दोन डिजिटल कार्यान्वयन मंचाची सुरुवात केली. नॅबी - लॅबीफाय  हे एक अनोखे  सॉफ्टवेअर असून ते  उपकरणे, उपयोगी वस्तू, मनुष्यबळ, बाह्य प्रकल्प इत्यादींच्या खरेदीसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत  पाठपुरावा सुलभ करेल.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1769026) आगंतुक पटल : 350
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi