युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
देशाच्या युवाशक्तीमध्ये लोकभागीदारीतून देश प्लास्टिकमुक्त करण्याची ताकद-अनुराग ठाकूर
भारतातील 3 लाख 41 हजार गावांमधून 108 लाख किलो प्लास्टिक गोळा करत नागरिकांनी मोठा विक्रम प्रस्थापित केला- अनुराग ठाकूर
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2021 8:42PM by PIB Mumbai
देशातील युवकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे आणि ही मोहीम पुढे न्यावी, असे आवाहन केंद्रीय माहिती प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छ भारत अभियान या महिनाभराच्या मोहिमेच्या सांगता समारंभात अवध विद्यापीठात(अवध), ते बोलत होते.


आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले नाही, मात्र देशाला प्लास्टिक कचरामुक्त करण्याच्या मोहिमेत आपण नक्कीच सहभागी होऊ शकतो, असे ठाकूर यावेळी म्हणाले.
देशातील स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी युवकांना केले. या महिनाभराच्या स्वच्छता मोहिमेत देशाच्या विविध भागातून 75 लाख किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते, मात्र या उद्दिष्टाच्या कितीतरी पलीकडे प्लास्टिक संकलन करण्यात आले. आतापर्यंत 3 लाख 41 हजार गावांतून 108 लाख किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. लोकसहभागातून या मोहिमेअंतर्गत सुमारे सहा लाख स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.


*****
MC/Radhika/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1768061)
आगंतुक पटल : 284