रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ लिमिटेडद्वारे (एनएचएसआरसीएल )मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी पहिले फुल स्पॅन ४० मीटर बॉक्स गर्डर टाकण्याची प्रक्रिया सुरु

सुमारे 970 मेट्रिक टन वजनाचा, हा भारतातील सर्वात जड प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर

एका महिन्यात सुमारे 300 फुल स्पॅन बॉक्स गर्डरची कमाल गरज पूर्ण करण्यासाठी कास्टिंग यार्ड आणि लॉन्चिंगसाठी अवजड यंत्रसामग्रीचे नियोजन

Posted On: 29 OCT 2021 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्टोबर 2021 

 

राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे महामंडळ  लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे  कॉरिडॉर (एमएएचएसआर) साठी उंच पुलाच्या बांधकामाला गती देण्यासाठी 40 मीटर स्पॅनच्या पहिल्या फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रिट (पीएस सी) बॉक्स गर्डर टाकण्याचे काम गुजरातमधील आणंद  येथील कास्टिंग यार्डमध्ये 28 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु केले.

40 मीटर लांबीच्या  प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रिट बॉक्स गर्डरचे वजन सुमारे 970 मेट्रिक टन आहे आणि हे भारतातील बांधकाम उद्योगातील सर्वात वजनदार प्री-स्ट्रेस्ड कॉंक्रिट  बॉक्स गर्डर असेल.कोणत्याही बांधकाम सांध्याशिवाय असलेल्या आणि 390 घन मीटर काँक्रीटसह  आणि 42 एमटी पोलादाचा चा समावेश असलेला 40 मीटर लांबीचा स्पॅन गर्डर एकाच खंडात टाकला जात आहे.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प 508 किमी लांबीचा असून 508 किमीपैकी 352 किमी गुजरात राज्यात (348 किमी) आणि दादरा आणि नगर हवेली (4 किमी) मध्ये आहे आणि उर्वरित 156 किमी महाराष्ट्र राज्यात आहे.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1767658) Visitor Counter : 95


Read this release in: English , Hindi