संरक्षण मंत्रालय

इंडो युके कोकण शक्ति 2021 सरावाची सांगता

Posted On: 28 OCT 2021 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

मुख्य नोंदी:

  • पहिलाच द्विपक्षीय त्रि सेवा सराव
  • इंडिया युके 2030 रोड मॅप, मे 2021 मध्ये दोन्ही देशाच्या पंतप्रधानांकडून जाहीर झाला होता, त्याचे फलित म्हणून हा त्रि-सराव पार पडला.

भारत आणि ब्रिटन यांच्या सशस्त्र दलांमध्ये कोकण शक्ती 21 हा पहिला द्विपक्षीय त्रि-सेवा सराव अरबी समुद्रात 27-10-2021 रोजी पार पडला.

या सरावाचा पहिला टप्पा सुरळीतपणे पार पडला. या टप्प्यात व्यावसायिक क्षमता, परस्परसंवाद , दोन्ही देशांमधील सामायिक वचनबद्धता आणि त्यांचे सैनिकबल यांचे दर्शन घडले. चार दिवस होत असलेल्या सराव सत्रात दोन्ही संरक्षण दलांनी हवेतील, पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाखालील तसेच अनेक संयुक्त बहु सेवा लढाऊ सरावांच्या माध्यमातून दोन्ही संरक्षण दलांमधील सहयोग यांचे प्रदर्शन घडले.

या सरावात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता.

दोन्ही दलांनी त्यांच्या गटांमध्ये सागरी मार्गावर कर्मचारी आणि अन्य सामुग्रीची अदलाबदल, हेलिकॉप्टरचे क्रॉस कंट्रोल, समुद्रातील युद्धसदृश स्थितीत मार्गक्रमण , हवेतील लक्ष्यांवर बंदुकीच्या फैरी यांसारखे सराव केले. युके (F35Bs) व भारतीय नौदल (MiG 29Ks) आणि भारतीय हवाई दल (SU-30 and Jaguar) यांच्या लढाऊ विमानांमध्ये समन्वय साधत हवेतील कसरती या सगळ्यातून दोन्ही देशांमधील अत्युच्च समन्वय, व्यावसायिकता आणि आवश्यकता पडेल तेव्हा संयुक्त सागरी सराव करण्याची क्षमता दिसून आली.

या सरावामुळे दोन्ही देशांना त्यांच्या अत्युत्तम सेवा आणि अनुभव यांचे देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. यामुळे जागतिक सुरक्षा परिप्रेक्षात दोन्ही देशांचा एकत्रित प्रभाव महत्त्वाचा असल्याचे अनुभवास आले.

पारंपारिकरित्या स्टीम पास्ट करून या सरावाची सांगता करण्यात आली.

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767337) Visitor Counter : 219


Read this release in: English , Urdu , Hindi