आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या सह-अध्यक्षेखालील नूतनीकृत क्षयरोग प्रतिसादासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एसईएआर उच्च-स्तरीय बैठकीच्या नेतृत्व सत्राला डॉ. भारती पवार यांनी केले संबोधित
“दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यापर्यंत त्वरित पोहोचणे हे एक आव्हान” - डॉ. भारती प्रवीण पवार
प्रविष्टि तिथि:
26 OCT 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाच्या, भारताच्या सह अध्यक्षतेखालील नूतनीकृत क्षयरोग प्रतिसादासाठीच्या उच्चस्तरीय बैठकीच्या नेतृत्व सत्राला संबोधित केले.

डॉ. भारती प्रवीण पवार यांनी, भारत या उच्चस्तरीय बैठकीचे सह-आयोजक असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि जागतिक आरोग्य संघटना दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रादेशिक संचालक डॉ पूनम सिंग यांनी ही बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
क्षयरोग निर्मूलनासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करत केंद्रीय राज्यमंत्री म्हणाल्या की, , “भारत सरकार आणि भागीदारांच्या पूर्ण सहकार्याने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ही वचनबद्धता पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताच्या क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षय रुग्णाच्या सर्व सह-विकारांवर देखील उपचार केले जातात . निक्षय पोषण योजनेद्वारे, सर्व क्षयरुग्णांना त्यांच्या उपचाराच्या संपूर्ण कालावधीत पोषण सहाय्य दिले जाते. रुग्णालयातील वॉर्ड आणि बाह्यरुग्ण प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये हवेमार्फत होणाऱ्या संक्रमणाच्या नियंत्रणासाठी हा कार्यक्रम काटेकोरपणे काम करत आहे. क्षयरोग रूग्ण आणि पीएलएचआईव्ही रूग्णांच्या संपर्कात आलेल्या बालकांमधील क्षयरोगाविरोधात केमोप्रोफिलॅक्सिसची तरतूद या कार्यक्रमात आधीपासूनच आहे. क्षयरोगींच्या संपर्कात येणाऱ्या प्रौढ व्यक्तींसाठी देखील आम्ही क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचारांचा विस्तार करण्याच्या प्रक्रियेत आहोत.”
त्या म्हणाल्या की, दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यापर्यंत त्वरित पोहोचणे हे एक आव्हान आहे आणि आम्ही भारतात क्षयरोग निर्मूलनासाठी लोक चळवळ म्हणून ‘टीबी मुक्त भारत अभियान’ सुरू केले आहे. भारत आपल्या शेजारील देशांना संभाव्य तांत्रिक सहाय्य आणि मदत देण्यास वचनबद्ध आहे.”
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1766766)
आगंतुक पटल : 308