सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी तेलंगणातील रामप्पा - काकतीय रुद्रेश्वर मंदिर येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ फलकाचे केले अनावरण
Posted On:
22 OCT 2021 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2021
केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या प्रकल्प/कार्यक्रमांच्या अंतर्गत, केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री श्री.जी. किशन रेड्डी यांनी 21 ऑक्टोबर रोजी तेलंगणाच्या मुलुगु आणि वारंगल जिल्ह्यांना भेट दिली.
केंद्रीय मंत्री श्री जी. किशन रेड्डी यांनी मुलुगु येथे स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत रस्त्यालगतच्या सुविधा आणि इतर सार्वजनिक सोयी सुविधांचे उद्घाटन केले.
"या सुविधांचा पर्यटकांना खूप फायदा होईल आणि मेडारामचे प्रवेशद्वार असलेल्या मुलुगु जिल्ह्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक आकर्षित होतील'', असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांनी तेलंगणाच्या मुलुगु येथील रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिराचा जागतिक वारसा स्थळाचा उल्लेख असलेल्या फलकाचे अनावरण केले.ते म्हणाले की, हा फलक महान काकतीयांची कल्पक बुद्धिमत्ता आणि स्थापत्य कौशल्येची ओळख आहे.रुद्रेश्वर मंदिर हे काकतीय काळातील अभिव्यक्त कला प्रकारांमधील विविध प्रयोगांचा समावेश असलेल्या सर्जनशील, कलात्मक आणि अभियांत्रिकी प्रतिभेच्या उच्च स्तराची एक अनोखी साक्ष आहे. ”
आपल्या दौऱ्यादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी भगवान शिव, विष्णू आणि सूर्य यांना समर्पित हणमकोंडा, वारंगल येथील हजार स्तंभ मंदिराला भेट दिली.हे मंदिर काकतीयांच्या महान कलांची साक्ष देणारा वारसा आहे आणि पर्यटनासाठी तेलंगणातील एक प्रतिष्ठित ठिकाण आहे
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1765849)
Visitor Counter : 222