वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

अनेक महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार करारासंदर्भात लवकर निर्णय घेण्यासाठी भारत सर्वोतोपरी प्रयत्नशील - पीयूष गोयल


'मेड इन इंडिया' उत्पादन जगाला हमी देणारे असायला हवे- पीयूष गोयल

Posted On: 22 OCT 2021 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 ऑक्टोबर 2021

वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, श्री पीयूष गोयल यांनी आज, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या प्रमुख मूल्यांसह नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीमध्ये मुक्त व्यापार करण्याचे आवाहन केले.जिथे भारताला अन्यायकारक किंवा अन्याय्य  वागणूक मिळेल, तिथे परस्पर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यापारात शुल्क-व्यतिरिक्त अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या  समस्यांचे निराकरण करण्याच्या आवश्यकतेवर श्री. गोयल यांनी भर दिला. ते आज नवी दिल्ली येथे भारतीय परदेशी व्यापार संस्थेच्या  54 व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.

100 कोटी लसीच्या मात्रा देण्याच्या भारताच्या  अलीकडील कामगिरीचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा टप्पा गाठणे म्हणजे  130 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे आणि भारताच्या 'आत्मनिर्भरतेचे' गमक आहे तसेच  शक्य तितक्या चांगल्या प्रमाणात आणि संपूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या  क्षमतांचा लाभ घेण्याचा भारताचा संकल्प आहे. "आपण जे काही करतो त्यामध्ये गुणवत्ता आणि उत्पादकता आणण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, 'मेड इन इंडिया' उत्पादन जगाला हमी देणारे असायला हवे.

पदवीधरांच्या  'ज्ञान संपादन' ते 'ज्ञानाचा वापर' पर्यंत प्रगतीच्या  प्रवासातील पुढची पायरी असलेला  दीक्षांत समारंभ हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, असे श्री पीयूष गोयल म्हणाले. 

1963 मध्ये स्थापन झाल्यापासून भारताच्या बाह्य व्यापारात मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांनी भारतीय परदेशी व्यापार संस्थेची प्रशंसा केली. बळकट ज्ञानसंपदा आणि स्रोतांच्या आधारावर भारतीय परदेशी व्यापार संस्थेला व्यापक मान्यता मिळाली आहे आणि आशिया-प्रशांत  क्षेत्रातील अग्रगण्य व्यवसाय शाळांमध्ये सातत्याने स्थान देण्यात आले आहे,असे त्यांनी सांगितले.

 

 M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765822) Visitor Counter : 231


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil