राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभ प्रसंगी राष्ट्रपतींनी बिहार विधिमंडळ सदस्यांना संबोधित केले

Posted On: 21 OCT 2021 2:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  21 ऑक्टोबर 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहिले आणि  त्यांनी बिहार विधिमंडळ सदस्यांना संबोधित केले. त्यांनी शताब्दी स्मृतीस्तंभाची पायाभरणीही केली आणि बिहार विधानसभेच्या परिसरात महाबोधी वृक्षाचे रोपटे लावले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, बिहार विधानसभेच्या शताब्दी वर्षाचा उत्सव हा लोकशाहीचा उत्सव आहे. बिहार विधिमंडळाच्या विद्यमान तसेच माजी सदस्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती हे आपल्या देशात विकसित निरोगी संसदीय परंपरेचे उत्तम उदाहरण आहे.

लोकशाहीत बिहारच्या योगदानाबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, बिहार ही जगातील पहिल्या लोकशाहीची भूमी असल्याचा त्यांना अभिमान आहे. भगवान बुद्धांनी जगाच्या सुरुवातीच्या प्रजासत्ताक देशांना सुज्ञपणा आणि करुणा यांची शिकवण दिली. तसेच, त्या प्रजासत्ताक देशांच्या लोकशाही व्यवस्थेच्या आधारावर भगवान बुद्धांनी संघांचे नियम ठरवले. संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांनी स्पष्ट केले की बौद्ध संघांचे अनेक नियम सध्याच्या संसदीय व्यवस्थेतही अस्तित्वात आहेत.

राष्ट्रपती म्हणाले की बिहार ही प्रतिभावंतांची भूमी आहे. या देशावर नालंदा, विक्रमशिला आणि ओदंतपुरी सारखी  जागतिक दर्जाची शिक्षण केंद्रे, आर्यभट्ट सारखे शास्त्रज्ञ, चाणक्य सारखे धोरणकर्ते आणि इतर महान व्यक्तिमत्त्वांनी संपूर्ण देशाला अभिमानास्पद अशी महान परंपरा स्थापित केली. ते म्हणाले की बिहारच्या लोकांना समृद्ध वारसा आहे आणि आता तो पुढे नेण्याची त्यांची जबाबदारी आहे.

 

 

 

 

 S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1765440) Visitor Counter : 273