पंतप्रधान कार्यालय

जागतिक इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील तज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


भारताला इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हे आपले लक्ष्य आहे : पंतप्रधान

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारतात इंधन तसेच नैसर्गिक वायू क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी भागीदार बनण्यास पंतप्रधानांचे आमंत्रण

ऊर्जाप्राप्ती , किफायतशीर ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षा या सर्वांशी संबंधित परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने सरकारने उचललेल्या पावलांचे संबंधित क्षेत्रातील दिग्गजांनी कैले कौतुक

Posted On: 20 OCT 2021 9:14PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इंधन आणि नैसर्गीक वायू क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तज्ञांशी संवाद साधला.

गेल्या सात वर्षात इंधन तसेच नैसर्गिक वायू क्षेत्रात हाती घेतलेल्या सुधारणांबाबत पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. याशिवाय इंधन शोध, परवाना धोरण, वायू विक्री, कोल बेड मिथेन, कोल  गॅसिफिकेशन आणि भारतीय नैसर्गीक वायू एक्सेंजमधील नुकत्याच  केलेल्या सुधारणा, या सर्व सुधारणांची वाटचाल इंधन व नैसर्गिक वायू क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सुरुच राहिल असे सांगत त्यांनीं या सुधारणांची विस्तृत चर्चा केली. 

इंधन क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी आपले लक्ष्य आता ‘महसूल’ याकडून ‘जास्तीत जास्त उत्पादन’ याकडे वळवल्याचं त्यांनी सांगितले. क्रूड इंधन साठवणीसाठीच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या आवश्यकतेबद्दलही त्यांनी सांगितले. देशात नैसर्गिक वायू इंधनाच्या भराभर वाढणाऱ्या मागणीबद्दलही ते बोलले. नैसर्गीक वायू वाहून नेणाऱ्या वाहिन्या, शहरातील नैसर्गीक वायू वितरण, आणि द्रवरुप नैसर्गीक वायू भरणा केंद्र यासारख्या आताच्या व पुढील वायू इंधन मूलभूत सुविधांमधील विकासावरही त्यांनी भाष्य केले. 

2016 पासून या अश्या बैठकांमध्ये मिळालेल्या सूचना या इंधन आणि आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील आव्हाने समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या. असे पंतप्रधान म्हणाले. भारत ही खुलेपणा, सकारात्मकता आणि संधींची भूमी आहे. नव्या कल्पना, नवे दृष्टिकोन आणि नवोन्मेष यांची सुपीक भूमी आहे. असे सांगून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांना भारतात इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील संशोधन व विकासासाठी भागीदार होण्याचे आमंत्रण दिले.

या संवादात इंधन आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात तील जागतिक स्तरावरील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. त्यामध्ये सौदी अराम्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासर, रोझनेफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इग्नोर सेशेन, ब्रिटिश पेट्रोलियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड लुनी, आयएचएस मरकिटचे उपाध्यक्ष डॅनियल येर्गीन, श्लमबर्जर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओलीवर ला पॉच, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांचा समावेश होता.

उर्जा प्राप्ती, किफायतशीर उर्जा आणि उर्जा सुरक्षा यातील परिस्थिती सुधारण्यात सरकारने प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दूरदर्शी आणि महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारण करत भारत स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करत आहे याचे त्यांनी कौतुक केले. स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानातील नवे वेगवान मार्ग स्वीकारत भारत जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीला वेगळा चेहरा देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

 शाश्वत आणि योग्य उर्जेकडे वाटचालीची खात्री देत त्यांनी स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आपल्या सूचना आणि दृष्टिकोन मांडले.

******

MC/VIjaya/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1765346) Visitor Counter : 248