आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते वर्धमान महावीर वैद्यकिय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयातील सीपीआर (cardio-pulmonary-resuscitation) प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन


“आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्वाचा असल्यामुळे प्रत्येकाला प्राथमिक जीवरक्षक कौशल्ये अवगत असणे आवश्यक”

Posted On: 20 OCT 2021 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते आज वर्धमान महावीर वैद्यकिय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयातील सीपीआर म्हणजेच (cardio-pulmonary-resuscitation) प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्राचे (CRTC) उद्घाटन झाले. जीवरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण आज सुरु करण्यात आले.

   

“आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवता येईल अश्या प्रकारचे प्रशिक्षण सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना देणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि कोणत्याही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जीव वाचवणारी प्राथमिक कौशल्ये नुसती माहित असून उपयोग नाही तर ती वरचेवर अद्ययावत करत रहायला हवी”, असे सांगत भारती पवार यांनी या प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. ही जीवरक्षक कौशल्ये रुग्णाच्या गरजांवर आधारित असावीत आणि ती सहजपणे अवगत होणारी असावीत तरच डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकिय कर्मचारी यांना त्याचे प्रशिक्षण देता येईल, असे त्यांनी सांगितले. “सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक जीवरक्षक कौशल्ये अवगत असावीत तरच तातडीची योग्य कृती प्राण वाचवू शकते”, असे त्यांनी नमूद केले. सर्वसाधारण स्तरावर जागृती करणे आणि सर्वसामान्यांनाही प्रशिक्षण देणे. विशेषतः युवावर्गाला प्रशिक्षण महत्वाचे आहे.  एखाद्या रुग्णाला होणाऱ्या त्रासात तत्पर मदतीसाठी युवावर्ग उपयोगी पडू शकेल. हृद्यविकाराचा झटका आला असताना प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. अश्या वेळी बघ्यांपैकी एखाद्याने केलेली तातडीची योग्य कृती हृद्याची बंद होत असलेली धडधड पुन्हा सुरु करु शकतो.

ठराविक गतीने आणि ठराविक जोर देत छातीवर दिला जाणारा दाब ही कृती प्रत्येकाला शिकवता येऊ शकते आणि वैद्यकिय मदत उपलब्ध होईपर्यंतच्या काळात रुग्णाला उपयोगी पडते व त्याला अथवा तिला जीवनदान मिळण्याच्या संधी वाढतात. अशी माहितीही त्यांनी दिली.

सहानुभूतीपूर्वक काळजी घेणे हासुद्धा रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारांमधीलच एक भाग असायला हवा यावर पवार यांनी जोर दिला. “रुग्णाची काळजी घेणाऱ्या समूहातील प्रत्येक आरोग्यरक्षकांची ही जबाबदारी आहे”असे त्यांनी ठासून सांगितले. परिचारिका, आरोग्य रक्षक आणि रिसेप्शनिस्ट यांच्यासोबत व्यतित होणारा रुग्णाचा काळ लक्षणीय असतो. या काळात रुग्णांप्रति सहानुभूती व सहवेदना व्यक्त केली जाऊ शकते. म्हणूनच प्रशिक्षण, प्रोत्साहन, आणि सहानुभूतीपूर्वक रुग्णसेवा ही रुग्णाला उत्तम अनुभव देऊ शकते. 

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1765303) Visitor Counter : 287


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil