ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठी आयात शुल्कात कपात केल्यानंतर खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्याचे सुनिश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्याची केंद्र सरकारची राज्य सरकारांना पत्राद्वारे सूचना
8 प्रमुख तेल उत्पादक राज्यांना लिहिलेले पत्र
आयात शुल्क कमी केल्याने ग्राहकांना विशेषतः सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल
Posted On:
14 OCT 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2021
खाद्यतेलांच्या आयात शुल्कात वाजवी प्रमाणात कपात केल्याच्या अनुषंगाने खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्याचे सुनिश्चित करण्यासाठी योग्य आणि त्वरित कार्यवाही करण्याच्या दृष्टीने, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व प्रमुख तेल उत्पादक राज्यांना पत्र लिहिले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या प्रमुख तेल उत्पादक राज्यांना केंद्र सरकारने हे पत्र लिहिले आहे.
विशेषतः आगामी सणासुदीच्या काळात, खाद्यतेलांच्या आधीच्या उच्च किमतींपासून तात्काळ दिलासा मिळावा म्हणून केंद्राने केलेल्या शुल्क कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना दिला जातो आहे का? हे राज्य सरकारांनी सुनिश्चित करावे असे निर्देश या पत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. यामुळे अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याचा दर कमी करण्यात आणि खाद्यतेलांच्या किमती प्रति किलो 15-20 रुपयांनी (अंदाजे) कमी होऊन सामान्य ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी मदत होईल.
गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कच्चे पाम तेल ,कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यावरील मूलभूत शुल्क 2.5% वरून शून्य केले आहे.शुद्ध , विरंजित आणि दुर्गंधीविरहीत पामोलिन तेल, शुद्ध सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क सध्याच्या 32.5% वरून 17.5% करण्यात आले आहे.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764054)
Visitor Counter : 306