रसायन आणि खते मंत्रालय

औषोधोत्पादन विभागाच्या वतीने 18 ऑक्टोबर 2021 रोजी 'औषधे आणि वैद्यकीय उपकरणे स्टार्टअप ग्रँड चॅलेंज' च्या विजेत्यांचा सत्कार समारंभ

औषोधोत्पादनाच्या बाबतीत प्रमाणानुसार भारत तिसऱ्या क्रमांकावर आणि मूल्यानुसार 14 व्या स्थानी

Posted On: 14 OCT 2021 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

रसायने आणि खते मंत्रालयाअंतर्गत  औषोधोत्पादन  विभाग आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या वतीने 18 ऑक्टोबर, 2021 रोजी सायंकाळी 5:00 ते  6:00 या वेळेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  ‘औषधे  आणि वैद्यकीय उपकरणे  स्टार्टअप ग्रँड चॅलेंज' या स्पर्धेतील  विजयी स्टार्ट-अप्स चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  स्टार्टअप्सना त्यांच्या आदर्श  नवोन्मेषासाठी  प्रोत्साहित करण्यासाठी  आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित सत्कार समारंभाला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने भारतीय नवकल्पनाकारांनी केलेल्या मोठ्या  प्रयत्नांचा आनंद साजरा करण्याच्या दृष्टीनें  हा कार्यक्रम उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय  भागीदारकांसाठी देखील आयोजित करण्यात आला आहे.

औषोधोत्पादन क्षेत्रांमध्ये नवोन्मेषला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला आणखी चालना देण्यासाठी,26 फेब्रुवारी, 2021 रोजी आयोजित  'इंडिया फार्मा आणि इंडिया मेडिकल डिव्हाइस 2021' या परिषदेत  'औषधे आणि वैद्यकीय उपकरणे स्टार्टअप ग्रँड चॅलेंज' ची सुरुवात  औषोधोत्पादन विभागाने केली होती. स्टार्टअप ग्रँड चॅलेंजसाठी हैदराबाद आणि अहमदाबाद येथील राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीईआर), इन्व्हेस्ट इंडिया आणि स्टार्टअप इंडिया हे सरकारचे भागीदार आहेत तर लौरस लॅब आणि बोस्टन सायंटिफिक हे सक्षम भागीदार आहेत.

स्टार्टअप चॅलेंजसाठी प्राप्त झालेल्या 310 स्टार्टअप अर्जांपैकी 218 वैद्यकीय उपकरणे क्षेत्रातील आणि 92 औषोधोत्पादन क्षेत्रातील होते.

मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीसाठी वैद्यकीय उपकरण क्षेत्रातून 17 स्टार्टअप आणि औषोधोत्पादन  क्षेत्रातील 5 स्टार्टअप्सची  निवड करण्यात आली,या फेरीत या स्टार्ट अप्सनी  दूरदृश्य प्रणालीच्या  माध्यमातून प्रख्यात व्यक्तींचा समावेश असलेल्या ज्युरी पॅनलसमोर त्यांच्या नवकल्पना सादर केलया.  दोन-टप्प्यांच्या कठोर मूल्यमापन प्रक्रियेनंतर, चार स्टार्टअप्सना दोन्ही क्षेत्रांसाठी विजेते आणि उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले.दोन विजेत्या स्टार्टअप्सना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे रोख अनुदान मिळेल आणि दोन उपविजेत्यांना प्रत्येकी 7 लाख  रुपयांचे अनुदान मिळेल. या शिवाय, चारही स्टार्टअप्सना 6 महिन्यांसाठी एक समर्पित मार्गदर्शक नियुक्त केला जाईल. आणि मूल्यांकनाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेल्या अव्वल 20+ स्टार्टअप्ससाठी येत्या काही महिन्यांत 'आभासी पद्धतीने प्रात्यक्षिक दिवस' आयोजित केला जाईल. ज्यात  सरकारी मंत्रालय/ विभाग, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, गुंतवणूकदार इत्यादी अधिकाऱ्यांकडे ते त्यांच्या कल्पना मांडतील.

 

 M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1763977) Visitor Counter : 29


Read this release in: English , Urdu , Hindi