सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास जोमाने व्हावा यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन


राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएलने नियामकीय परवानग्या मिळवून योगदान करारावर स्वाक्षऱ्या केल्या

Posted On: 12 OCT 2021 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एमएसएमई क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. केंद्रीय मंत्र्यांनी ठामपणे बजावले की त्यांना या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली हवी आहे आणि त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा असे ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न गाठणे शक्य होईल याकडे  राणे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर आज नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्या कार्यक्रमात राणे बोलत होते. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के.सुरेश हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळविण्यात येत असलेल्या विविध कमतरता भरून काढण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. परिणामी, भारत सरकारच्या एम’एसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ या मिनी-रत्न महामंडळाची 100% उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली.एआयएफ नियमांच्या अंतर्गत परवानगी असलेल्या इक्विटी, क्वासी-इक्विटी, आणि डेट यांच्या माध्यमातून ईमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि 10,006 कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने एसआरआय निधी अर्थात आत्मनिर्भर निधीची स्थापना करण्यात आली.

यासाठी एसबीआयसीएपी व्हेंचर्स मर्या (एसव्हीएल) या कंपनीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली असून एनव्हीसीएफएलची कायदेविषयक सल्लगार म्हणून खेतान आणि कंपनी यांची नेमणूक करण्यात आली आहे. एनव्हीसीएफएलने सेबी अर्थात ठेवी आणि विनिमय मंडळाकडे खासगी प्लेसमेंट मेमोरँडम सादर केले असून त्यायोगे 1 सप्टेंबर 2021 ला सेबीने एसआरआय निधीची दुसऱ्या श्रेणीच्या पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी केली.

एसआरआय निधी एमएसएमई क्षेत्रापुढील इक्विटी निधीच्या आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल आणि या उद्योगांना त्यांच्या पुढील अडचणी पार करण्यासाठी आवश्यक क्षमता देईल, कॉर्पोरेटायझेशनला प्रोत्साहन देईल आणि त्यांच्या संपूर्ण पायाभूत क्षमतांसह जागतिक दर्जाचे विजेते म्हणून विकास पावण्यासाठी बळ देईल.सरकारी हस्तक्षेपासह, हा निधी कमी प्रमाणात निधी मिळालेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांकडे विविध प्रकारच्या निधींचे सुरळीत मार्गीकरण करेल आणि टिकाऊ व उच्च विकास क्षमता असणाऱ्या  एमएसएमई उद्योगांच्या वाढीच्या समस्यांमध्ये मदत करेल.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763239) Visitor Counter : 236


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu