PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 11 OCT 2021 7:27PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 95.19 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Recovery Rate currently at 98.00%; Highest since March 2020
  • 21,563 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,32,93,478
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.67%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 2,27,347; lowest in 209 days
  • 18,132 new cases in the last 24 hours; lowest in 215 days
  • Weekly Positivity Rate (1.53%) less than 3% for last 108 days
  • Daily positivity rate (1.75%) less than 3% for last 42 days
  • 58.36 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 11 ऑक्टोबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46,57,679 मात्रा देण्यात आल्यामुळे, देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 95 कोटींचा (95,19,84,373) महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात 92,57,689 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 21,563 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,32,93,478 झाली आहे. परिणामी, सध्या, देशातील रोगमुक्ती दर 98.00% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा सर्वोच्च रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 106 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी राखण्यात यश आले आहे. गेल्या 24 तासांत, 18,132 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात नोंदल्या जाणाऱ्या कोविड रुग्णांची गेल्या 215 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 2,27,347 इतकी आहे, गेल्या 209 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.67% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,35,797 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 58 कोटी 36 लाखांहून अधिक (58,36,31,490) चाचण्या करण्यात आल्या. देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात आहे, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.53% असून गेले 108 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.75% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 42 दिवस 3% हून कमी आहे आणि गेले सलग 125 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1763023) Visitor Counter : 13