विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताने 2025 पर्यंत जागतिक पातळीवरील प्रमुख 5 देशांमध्ये भारताने स्थान मिळविलेले असेल आणि वैश्विक जैव-उत्पादक केंद्र म्हणून मान्यता मिळविलेली असेल - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग
Posted On:
08 OCT 2021 9:52PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज सांगितले की येत्या 2025 सालापर्यंत, जागतिक पातळीवरील प्रमुख 5 देशांमध्ये भारताने स्थान मिळविलेले असेल आणि वैश्विक जैव-उत्पादक केंद्र म्हणून मान्यता मिळविलेली असेल. ते म्हणाले की पंतप्रधानांच्या 2024-25 पर्यंत 5 ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यात योगदान देण्याच्या दृष्टीने सध्याच्या 70 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेकडून लवकरच भारताची जैव-अर्थव्यवस्था 150 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय वनस्पती जनुक संशोधन संस्थेने विकसित केलेल्या भारतीय तांदूळ आणि हरभऱ्याची (डीएनए पॅनअॅरे) जनुकीय रूपे जारी करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की, तांदूळ आणि हरभऱ्याच्या अनुक्रमे इंद्रा आणि इंडिका या दोन डीएनए चिप्स या दोन पिकांच्या संपूर्ण जनुकांच्या जीनोटायपिंग मालिका आहेत आणि त्या देशाच्या अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी भारतीय वनस्पतींच्या जैवविविधतेबाबत आणि जनुकीय विविधते बाबतच्या मोठ्या क्षमतांचा शोध घेतील.
भारताला 2025 पर्यंत जैव केंद्र होण्यासाठी आणि दुसरी हरित क्रांती घडविण्यासाठी मुख्य पिकांच्या जातींचे जर्मप्लाझम गुणवर्णन, उच्च प्रमाणात उत्पादन देणारे, हवामानाबाबत लवचिकता असणारे, रोगांशी लढा देणारे आणि उच्च पोषण मूल्य असणारे, जनुकीय संपादनातून पिकांच्या सुधारित जाती, पक्षीजन्य आणि प्राणीजन्य आजार यांसाठी एएमआर वरील वन हेल्थ अभियान, सुधारित आणि कृतीशील अन्नासाठी राष्ट्रीय पोषण अभियान, किफायतशीर वनस्पतीजन्य औषधांच्या विकसनासाठी फायटोफार्मा अभियान आणि कचऱ्यापासून मूल्य तंत्रज्ञान संबंधी अभियान असे विविध कार्यक्रम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहेत याकडे डॉ.जितेंद्र सिंग यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
केंद्रीय मंत्र्यांनी एनआयपीजीआर वेगवान ब्रीडिंग आणि उच्च थ्रूपुट फिल्ड फिनोटायपिंग साठी प्रथम भाषांतरीय सुविधेचे देखील उद्घाटन केले. ते म्हणाले वेगवान ब्रीडिंग तंत्रज्ञान पिकांच्या विकास आणि त्वरित वेगवान वाढीला प्रोत्साहन देऊन आणि पिकांच्या पिढ्यांची वेगाने वाढ करून एका वर्षात 4 ते 6 पिके घेण्यासाठी ब्रीडिंग चक्राचा कालावधी कमी करते. ते पुढे म्हणाले की, संपूर्णपणे बंदिस्त, नियंत्रित वातावरण असलेल्या विकास चेंबर्स मध्ये पूरक वातावरण पुरवून गहू, सातू, हरभरा, वाटणा, मोहरी आणि शेंगदाणा यांच्या वाढीचे सादरीकरण करण्यात आले.
डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले की एनआयपीजीआर ही जैवतंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असून आता या संस्थेला वनस्पती शास्त्रातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे. ते म्हणाले की संस्थेतील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी उत्तम मानवी पोषणमूल्ये देणारी आणि जनुक संपादन, जनुकीय अभियांत्रिकी आणि अतिसूक्ष्म कणांच्या मदतीने ब्रीडिंग अशा जैवतंत्रज्ञानाच्या विविध साधनांच्या वापरणे अधिक उत्पादन देणारी तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी मूल्यवर्धित जाती विकसित केल्या आहेत.
नुकतेच या संस्थेने फळे आणि भाजीपाला यांचे साठवण आयुष्य वाढविणारे साधन विकसित केले आणि “फ्रुव्हटेक”नावाचा संस्थेचा पहिला स्टार्ट अप स्थापन केला.
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762279)
Visitor Counter : 299