शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अखिल महिला प्रतिनिधीमंडळाने घेतली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2021 8:17PM by PIB Mumbai

 

महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या अखिल महिला प्रतिनिधीमंडळाने आज केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. समाजातील महिलांच्या स्थितीविषयी, त्यांच्याशी निगडीत महत्वाच्या मुद्यांवर अध्ययन आणि संशोधन करणारे हे केंद्र आहे. भारतातील महिलांची स्थितीया विषयावरील अहवालही यावेळी प्रधान यांना सादर करण्यात आला

शिक्षणाच्या माध्यमातून, समाजातल्या लिंग समानता याविषयी जागृती आणि संवेदनशीलता निर्माण करण्याची गरज आहे, यासाठी काय करता येईल, याचे सल्ले या मंडळाने दिले. तसेच, एनसीसी/एनएसएस/स्काऊट गाईड अशा उपक्रमात मुलींचा सहभाग वाढवणे, मुलींच्या कौशल्यविकासाचे आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवण्याचे प्रयत्न आणि इतर मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1762246) आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी