गृह मंत्रालय
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील कारागृह प्रमुखांची 7 वी राष्ट्रीय परिषद
पोलीस संशोधन आणि विकास मंडळ, महिपालपूर, नवी दिल्ली
Posted On:
07 OCT 2021 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2021
केंद्रीय गृह व्यवहार राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कारागृह प्रमुखांच्या दोन दिवसीय 7 व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय गृह व्यवहार राज्यमंत्र्यांनी खालील मुद्यांवर भर दिला:
- 25 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचे 75 ज्येष्ठ कारागृह अधिकारी उपस्थित असलेली ही परिषद म्हणजे मुद्यांवर विस्तृत चर्चा करून विस्तारित दृष्टीकोन आणि रुंदावलेल्या स्वीकारार्हतेबाबत धोरण निश्चित करण्यासाठीचा योग्य मंच आहे.
- तुरुंगातील कैद्यांना सुरक्षित वातावरण मिळवून देणे हे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या कार्यातील प्रमुख आव्हान आहे.
- तुरुंगात राहणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांचा कौशल्य विकास करण्यासाठीच्या तसेच तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्या लोकांची काळजी घेण्यासाठीच्या तरतुदी कारागृह व्यवस्थेत असल्या पाहिजेत.
- ई-तुरुंग ही संकल्पना वेळेची बचत करते आणि पुढे न्यायालयांशी जोडले जाण्याची प्रक्रिया सोपी करते. ई-तुरुंग संकल्पनेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ई-मुलाखत, या संकल्पनेने तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सोपी केली आहे
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761903)
Visitor Counter : 235