संरक्षण मंत्रालय

जपान- भारतादरम्यानचा सागरी अभ्यास, ‘जीमेक्स’चे पाचवे सत्र

Posted On: 05 OCT 2021 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

भारत- जपान दरम्यानचा संयुक्त द्विपक्षीय सागरी अभ्यास, ‘जिमेक्स’, अरबी समुद्रात सहा ते आठ ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे. भारतीय नौदल आणि जपान सागरी स्वसंरक्षण दल यांच्यात हा सराव होणार आहे.

जानेवारी 2012 पासून जिमेक्सच्या या संयुक्त अभ्यासाची सुरुवात झाली असून त्यात सागरी सुरक्षा सहकार्यावर विशेष भर दिला जातो. जीमेक्सचा शेवटचा अभ्यास सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आला होता.

भारतीय बनावटीच्या गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका, कोची आणि गाईडेड क्षेपणास्त्र फ्रीगेट तेग यांनी, पश्चिम विभागाचे फ्लग ऑफिसर कमांडिंग रेअर अडमिरल अजय कोचर, हे भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जपानी सागरी संरक्षण दलाचे जेएमएसडीएफ जहाज कागा, इझुमो श्रेणीचे हेलीकॉप्टर वाहक, मुरासेम, ही गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिका, रिअर अडमिरल इकेयुचीलांजझुरू कमांडर एस्कॉर्ट फ्लोरिटा- 3 (CCF-3) जपानच्या जहाजाचे प्रतिनिधित्व करणार आहे. जहाजांव्यतिरिक्त, पी-81 या लांब पल्ल्याच्या सागरी गस्ती लढावू विमाने, डोर्नीयर सागरी गस्ती लढावू विमाने, इंटिग्रल हेलिकॉप्टर आणि मिग 29के ही लढावू विमाने, देखील या अभ्यासात सहभागी होणार आहेत.  

जीमेक्स- 21 चा उद्देश, कार्यवाहीच्या प्रक्रीयेची सामाईक समज विकसित होणे, बहुसंख्य संयुक्त युद्धाभ्यास करून, त्याद्वारे संपूर्ण सागरी कार्यान्वयन क्षेत्रात, आंतर कार्यान्वयन समन्वय वाढवणे, हा आहे. बहुआयामी अशा सामरिक अभ्यास, ज्यात हत्यार चालवणे, क्रॉस डेक हेलीकॉप्टर ऑपरेशन्स आणि कॉप्लेक्स सरफेस, पाणबुडी-रोधी आणि हवाई युद्धसराव अशा सर्व युद्धाभ्यासाद्वारे, दोन्ही नौदलातील समन्वय वाढण्यास मदत होईल.

भारत आणि जपान यांच्यातील नौदल सहकार्याची व्याप्ती आणि संमिश्रता, यात गेल्या अनेक वर्षात, लक्षणीय वाढ झाली आहे. जीमेक्स -21 मुळे दोन्ही नौदलातील सहकार्य आणि परस्पर संवाद अधिक दृढ होईल आणि दोन्ही देशातील मैत्री अधिकच वृद्धिंगत होईल.

 

 

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1761202) Visitor Counter : 272


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil