मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
Posted On:
04 OCT 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2021
केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ.एल. मुरुगन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ.एल. मुरुगन यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान डॉ.मुरुगन यांनी पंतप्रधानांना “थिरूक्कुरल- पर्ल्स ऑफ इन्स्पिरेशन” या पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली आणि नवीन भारतातील जनतेच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली परिश्रमपूर्वक काम करण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760881)
अभ्यागत कक्ष : 186