उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपण आपल्या नद्यांचे संरक्षण तत्परतेने करायला हवे:  उपराष्ट्रपती


ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील वारसा तसेच-सांस्कृतिक केंद्राचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन

Posted On: 03 OCT 2021 1:02PM by PIB Mumbai

 

एक प्रभावशाली राष्ट्रीय मोहीम हाती घेत आपल्या नद्यांचे पुनर्रुजीवन करण्याची आवश्यकता असून, तत्परतेने आपण आपल्या नद्यांचे संरक्षण करायला हवे आहेअसे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम. वेंकैया नायडू यांनी आज केले.

भारतातील नद्या त्यांच्या जीवन-पुनरुज्जिवित करण्याच्या शक्तीसाठी नेहमीच वंदनीय राहिल्या आहेत आणि  हे लक्षात घेऊन श्री नायडू यांनी  वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे देशाच्या विविध भागांमधील नद्या आणि इतर जलाशयांचे प्रदूषण झाले आहे याकडे लक्ष वेधले.ते म्हणाले की पूर्वी, आमच्या गावांत आणि शहरांत जागोजागी जलाशय आढळून यायचे.  आधुनिकीकरणाच्या शोधात, लोभाने प्रेरित होऊन,मानवाने,नैसर्गिक परिसंस्था नष्ट केल्या आहेत आणि अनेक ठिकाणांहून, पाणवठे अक्षरशः गायब झाले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

आज गुवाहाटी येथे आपल्या ईशान्य दौऱ्यावर आलेल्या उपराष्ट्रपतींनी ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील वारसा तसेच-सांस्कृतिक केंद्राचे उदघाटन करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी केंद्रातील वस्तूसंग्रहालयाला भेट दिली तसेच 'फॉरएव्हर गुवाहाटी' या कॉफी-टेबल पुस्तकाचे प्रकाशनही केले.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor


(Release ID: 1760594) Visitor Counter : 259