उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला देशाला शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2021 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
उपराष्ट्रपती, श्री एम. वेंकैया नायडू यांनी गांधी जयंतीनिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी दिलेला संपूर्ण संदेश खालीलप्रमाणे आहे -
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिष्टचिंतन करतो.”
महात्मा गांधींनी जगाला अन्यायाविरुद्ध लढण्याचा सत्य आणि अहिंसेचा एक नवीन मार्ग दाखवला आणि मानवतेवर एक अमिट छाप सोडली. त्यांनी सत्य (सत्याग्रह) आणि अहिंसा (अहिंसा) या मूल्यांवर भारताला वसाहतवादी राजवटीपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 21 व्या शतकातही ते वंचितांचे कैवारी आणि प्रतीक राहिले आहेत.
गांधीजींनी वैयक्तिक जीवनाद्वारे उदाहरण घालून दिले आणि म्हणाले की त्यांचे जीवन हा त्यांचा संदेश आहे. शाश्वत विकास, स्वावलंबन, उपेक्षित लोकांचे सक्षमीकरण आणि 'ग्राम स्वराज्या'साठी आग्रह याबाबत आपण त्यांच्या जीवनापासून आणि तत्त्वज्ञानापासून प्रेरणा घेऊ शकतो. गांधीजींच्या विचारातील या संकल्पना आधुनिक काळात अधिक कालसुसंगत झाल्या आहेत. त्यांचे जीवन देशासाठी प्रकाशाचा स्रोत आहे, जो आपल्या राष्ट्रीय प्रगतीत मार्गदर्शन करत आहे.
गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व आम्हाला आणि उर्वरित जगाला शांतता, सौहार्द आणि वैश्विक बंधुत्वाच्या सामायिक शोधात मार्गदर्शन करत राहील.
मी पुन्हा एकदा आपल्या देशातील नागरिकांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.
जय हिंद! ”
इंग्लिश / हिंदी मधून संदेशासाठी येथे क्लिक करा
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1759983)
आगंतुक पटल : 255