रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 यांच्याशी संबधित कागदपत्रांच्या वैधतेला 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
30 SEP 2021 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2021
मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 यांच्याशी संबधीत कागदपत्रांच्या वैधतेला मुदतवाढ देण्यासंबधी अधिसूचना 30 मार्च, 2020, 9 जून 2020 , 24 ऑगस्ट 2020, 27 डिसेंबर 2020 ,26 मार्च 2021 and 17 जून 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केल्या होत्या. या अधिसूचनांनुसार फिटनेस वैधता, सर्व प्रकारचे परवाने, वाहन चालन परवाना, नोंदणी किंवा इतर संबधित कागदपत्रे यांची वैधता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत कायम राखली गेली होती.
कोविड 19 चा प्रसार रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, वरील सर्व कागदपत्रांची वैधता 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत कायम राखण्याची सूचना करण्यात आली आहे. यामध्ये 1 फेब्रुवारी 2020 पासून वैधता संपलेल्या सर्व कागदपत्रांना तसेच 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत वैधता संपत आलेल्या सर्व कागदपत्रांना ही अधिसूचना लागू आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अश्या कागदपत्रांना 31 ऑक्टोबर 2021 वैध मानावे अशी सूचना केली आहे. यामुळे नागरिकांना सामाजिक अंतराचे नियम पाळत वाहतूकसंबधित सेवा मिळवण्यास मदत होईल.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759796)
Visitor Counter : 616