सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सक्षम ज्येष्ठ नागरिकांना सन्माननीय पद्धतीने पुन्हा रोजगाराची संधी देण्याबाबतचे (सॅक्रीड)पोर्टल
रोजगाराच्या शोधात असणारे ज्येष्ठ नागरिक आणि रोजगार पुरविणारे यांना एकाच मंचावर आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाधारित पोर्टल विकसित होणार
ज्येष्ठ नागरिकांना निरोगी, आनंदी, सक्षम, सन्मान्य आणि स्वावलंबी आयुष्य जगणे सुनिश्चित करण्याचे मार्ग विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे
हा मंच विकसित करण्यासाठी निधी उभा करण्यासाठी 10 कोटी रुपये तसेच या पोर्टलच्या भविष्यातील देखभाल खर्चासाठी, प्रतिवर्षी 2 कोटी रुपये पुढील 5 वर्षे कालावधीत देणार
लासी अभ्यास अहवालानुसार देशातील 50% ज्येष्ठ नागरिक सक्रीय आहेत असे निदर्शनास आले आहे.
Posted On:
30 SEP 2021 7:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2021
भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत स्थिर वेगाने वाढ होताना दिसत आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 1951 साली 1 कोटी 98 लाख होती, त्यात वाढ होऊन 2001 साली ती 7 कोटी 60 लाख झाली तर 2011 मध्ये ती तब्बल 10 कोटी 38 लाख वर पोहोचली. भारत आणि राज्यांतील लोकसंख्या वाढीबाबत अभ्यास करणाऱ्या तांत्रिक गटाने (2011-2036) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येची तपशीलवार माहिती खाली दिली आहे:-
2011
|
2021
|
2026
|
2031
|
2036
|
Population
|
%
|
Population
|
%
|
Population
|
%
|
Population
|
%
|
Population
|
%
|
0.38
|
8.66
|
13.76
|
10.1
|
16.28
|
11.4
|
19.34
|
13.1
|
22.74
|
14.9
|
गेल्या काही वर्षांत आरोग्य सुविधांमध्ये झालेली सर्वसामान्य सुधारणा हे ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिसून आलेल्या वाढीचे मुख्य कारण आहे. ज्येष्ठ नागरिक केवळ दीर्घ काळ जगतील याची काळजी घेणेच नव्हे तर ते सुरक्षित, सन्माननीय आणि उत्पादक जीवन जगतील याची सुनिश्चिती करणे हे मोठे आव्हान आहे.
म्हणून, एकूणच संपूर्ण समाजाला, विशेषतः खालील भागधारकांना वयस्कर नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कामात सहभागी करून घेऊन, सशक्त सामाजिक आणि पिढ्यांतर्गत बंधांसह या ज्येष्ठ नागरिकांना निरोगी, आनंदी, सक्षम, मानाचे आणि स्वावलंबी आयुष्य जगता येईल अशा समाजाची उभारणी देशभरात करून देण्याची मार्ग विकसित करणे हे खरे आव्हान आहे.
- खासगी कंपन्या/कॉर्पोरेट कंपन्या
- शैक्षणिक संस्था
- सरकारी क्षेत्रे आणि स्थानिक संस्था यांतील सल्लागार सेवांसाठी
- विना-नफा तत्वावर काम करणाऱ्या बिगर-सरकारी संघटना, सहकारी संस्था / विश्वस्त संस्था, इत्यादी.
- प्रसारमाध्यमे आणि शेवटी संपूर्ण लोकसमुदाय
लासी या अभ्यास गटाच्या 2020 च्या अहवालानुसार देशातील 50% ज्येष्ठ नागरिक सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला उत्तम अनुभव, वेळ आणि उर्जा अनुभवी आणि अविचलपणे एका ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असणाऱ्या व्यवसाय संस्थांना उपयुक्त ठरू शकतो. अनेक खासगी व्यवसायांचे मनुष्यबळ विभाग विशिष्ट पदांसाठी अनुभवी आणि एकाच कंपनीत अविचलित पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींच्या शोधात असतात. नव्याने विकसित होणारे हे पोर्टल आभासी पद्धतीने अशा लोकांचे एकमेकांना अनुकूल प्राधान्यक्रम लक्षात घेऊन त्यांना एकत्र आणु शकेल.
पोर्टलच्या कार्य कक्षा
- रोजगाराच्या शोधात असणारे ज्येष्ठ नागरिक आणि रोजगार पुरवठादार यांना एका मंचावर एकत्र आणणारे माहिती तंत्रज्ञानाधारित पोर्टल विकसित करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी पारदर्शक प्रक्रियेतून निवडण्यात आलेल्या संस्थेकडे असेल.
- ज्येष्ठ नागरिक व्यक्तिगत पातळीवर त्यांचे शिक्षण, पूर्वानुभव,कौशल्ये आणि काम करण्यासाठी आवडीची क्षेत्रे या माहितीसह पोर्टलवर स्वतःची नावनोंदणी करेल. ही व्यक्ती अपेक्षित कामाच्या संबंधीचे महत्त्वाचे शब्द देखील निवडेल जेणेकरून नोकरी देणाऱ्या व्यक्ती/संस्था त्यांच्यापर्यंत आपोआप पोहोचू शकतील. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे वैयक्तिक तपशील भरावे लागतील.
- नोकरी देणाऱ्या कोणत्याही-व्यक्ती/संस्था/कंपन्या/भागीदार संस्था/ स्वयंसेवी संस्था,इत्यादी देखील पोर्टलवर नोंदणी करू शकतील. नोकऱ्या देणाऱ्यांना विशिष्ट काम आणि ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या नमूद करावी लागेल.
- स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिकांना अशा नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याच्या कामात मदत करतील. कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचे शुल्क ज्येष्ठ नागरिकांकडून घेता येणार नाही. म्हणून हे रोजगार पोर्टल नोकरी शोधणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर नोकऱ्या देऊ करणाऱ्यांना, स्वयंसहाय्यता बचत गटांना, कौशल्ये प्राप्त करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि इतर संस्था तसेच व्यक्तींना सेवा पुरवेल.
- हे रोजगार विनिमय पोर्टल नोकरी अथवा रोजगार मिळण्याची हमी देणार नाही, बचत गटांच्या उत्पादने विकण्यास मदत करणार नाही किंवा इतर कोणताही व्यवहार करणार नाही.
- कोणतीही व्यक्ती/संस्था/कंपनी जीला नव्या कर्मचाऱ्याला कामावर घेण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडे असलेला अनुभव अधिक महत्त्वाचा आहे, तीला हे पोर्टल उपयोगी ठरेल
कार्यपद्धती: हे वेब पोर्टल राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राद्वारे विकसित केले जाईल. या पोर्टलवर नाव नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि विविध व्यावसायिक संस्था यांच्यामध्ये पुरेशी जाहिरात करण्यात येईल.
खर्च : हा मंच विकसित करण्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी 10 कोटी रुपये देण्यात येतील.तसेच या पोर्टलची देखभाल करण्यासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिवर्षी 2 कोटी रुपये देखभाल मदत अनुदान देण्यात येईल. या उपक्रमाचा खर्च प्रत्यक्ष खर्चावर आधारभूत असेल. विविध व्यापारी संस्थांमध्ये या पोर्टलची जाहिरात करण्यासाठी दर वर्षी 10 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759729)
Visitor Counter : 505