रेल्वे मंत्रालय

अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजेच युटीएस मोबाईल एप्लीकेशन आता हिंदीमध्येही उपलब्ध

Posted On: 24 SEP 2021 7:52PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने 'डिजिटल भारत'ला चालना देण्यासाठी तसेच रोकड विरहित व्यवहारसंपर्क विरहित व्यवहार आणि ग्राहक सुविधा ही तीनही उद्दिष्टे ध्यानात घेऊन यूटीएस म्हणजेच अनारक्षित तिकीट प्रणाली आता इंग्लिश बरोबरच हिंदी भाषेतही उपलब्ध करून दिली आहे.

या मोबाईल ॲप वापरकर्त्याला आपल्या पसंतीची कोणतीही एक भाषा वापरता येईल. त्याच प्रमाणे कागदावर छापलेले किंवा डिजिटल अशा कोणत्याही प्रकारातले तिकीट मिळवता येईल. यामध्ये खालील सुविधा मिळतील..

  • प्रवासी तिकीट बुकिंग
  • सीजन तिकीट बुकिंग किंवा नूतनीकरण
  • प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • प्रवाशांना मोबाईल तिकीट प्रणालीचे मिळणारे लाभ
  • तिकिटांच्या रांगेत थांबायची आवश्यकता उरणार नाही.
  • विना कागद आणि पर्यावरणपूरक
  • बुक केलेले तिकीट ऑफलाइन मोडमध्ये सुद्धा TTE वर बघता येईल त्यासाठी इंटरनेट वापरण्याची गरज नाही.

केव्हाही तिकीट काढण्याची सोय प्रवाशांना उपलब्ध होईल. शिवाय अगदी शेवटच्या क्षणी प्रवासाचा निर्णय घ्यावा लागत असेल तर फक्त स्थानकावर पोचून स्थानकावर विविध ठिकाणी असलेला क्यू आर कोड स्कॅन करून घेऊन त्यावरून तिकीट बुक करता येईल. ही सुविधा सध्या सोळाशे स्थानकांवर उपलब्ध आहे.

पूर्णपणे रोकड विरहित :ग्राहक रेल वॉलेट डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यूपीआय आणि वॉलेट्स अशा कोणत्याही डिजिटल पद्धतीने तिकिटाचे पैसे चुकते करू शकेल.

किफायतशीर:- रेल-वॉलेट सुविधा वापरणाऱ्या ग्राहकाला त्याच्या रिचार्जवर पाच टक्के बोनस दिला जाईल. म्हणजेच जर प्रवासी हजार रुपयाचे वॉलेट रिचार्ज करत असेल तर त्याला 1050 रुपयाची रिचार्ज किंमत मिळेल.

हे मोबाईल तिकीट एप्लीकेशन पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी विकसित केले असून अँड्रॉइड आणि आय एस या दोन्ही त्यावर ते उपलब्ध आहे अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही मंचावर उपलब्ध असून संबंधित स्टोअर्स मधून घेता येतील.

ग्राहकांचा उत्तम अनुभव आणि गुगल प्ले स्टोअर मध्ये चार तारांकित रेटिंग मिळवून या ॲपने ग्राहक अनुभव आणि सोपी हाताळणी या दोन्ही बाबतीत वाहवा मिळवली आहे. यु टी एस मोबाईल ॲप्लिकेशनचे 1.47 करोड नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757827) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu