PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
23 SEP 2021 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 23 सप्टेंबर 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात गेल्या 24 तासात 71,38,205 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 83 कोटींपेक्षा अधिक मात्रा (83,39,90,049) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,69,260 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 31,990 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,28,15,731 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या गेल्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 88 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे. गेल्या 24 तासात 31,923 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,640 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत. ही गेल्या मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,27,443 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.83 कोटींहून अधिक (55,83,67,013) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.11% असून गेले 90 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.09% इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी आणि 107 दिवस 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स:-
- केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 80.67कोटींपेक्षा जास्त (80,67,26,335)लसींच्या मात्रा राज्ये/केन्द्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत आणि 64 लाख (64,00,000) मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय लसीच्या 4.29 कोटी पेक्षा जास्त (4,29,03,090) शिल्लक आणि वापरलेल्या नाहीत अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
- भारताच्या दृष्टीने मानवता म्हणजे नेहमीच एक संपूर्ण कुटुंब असते. भारतीय औषध निर्माण उद्योगाने किफायतशीर निदान संच, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पीपीई संच यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे जगातल्या अनेक विकसनशील देशांना स्वस्त, परवडणारे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणि आम्ही 150 पेक्षा जास्त देशांना औषधे आणि वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा केला आहे. स्वदेशी बनावटीच्या दोन लसींना भारतामध्ये ‘आकस्मिक परिस्थितीतल्या वापरासाठी मान्यता’ मिळाली आहे. यामध्ये जगातल्या पहिल्या ‘डीएनए-आधारित’ लसीचा समावेश आहे.
- कोविड पश्चात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडवीय यांनी आज प्रकाशन केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यावेळी उपस्थित होत्या.कोविडच्या दीर्घकालीन परिणामांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातील डॉक्टर, परिचारिका, निम-वैद्यकीय कर्मचारी आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी ही मार्गदर्शक तत्वे उपयुक्त ठरतील.
M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757434)
Visitor Counter : 228