संरक्षण मंत्रालय
आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय नौदलाच्या वतीने सेलिंग रिगाटा (नौकानयन स्पर्धा) आणि सागरी कवायतींचे आयोजन
Posted On:
21 SEP 2021 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2021
आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने या उपक्रमांचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल इंडियन नेव्हल सेलिंग असोसिएशन च्या वतीने स्थानिक पातळीवर नौकानयन लोकप्रिय करण्यासाठी, नौदलाच्या तिन्ही मुख्यालयांच्या ठिकाणी डिंगी(छोट्या बोटी) आणि नौका यांच्या नौकानयन स्पर्धा आणि कवायतींचे आयोजन केले आहे.
यातील पहिला कार्यक्रम 23 सप्टेंबर 21 रोजी, कोची येथील एर्नाकुलम चॅनेलमधील भारतीय नौदल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर द्वारे आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात एकूण 75 नौसैनिक सहभागी होतील आणि ते आपले नौका कौशल्य या कार्यक्रमातून सादर करतील. नौदलाच्या दक्षिण विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. इंडियन नेव्हल ओशन सेलिंग वेसल्स, विविध प्रकारच्या नौका आणि दक्षिण नौदल कमांडच्या छोट्या बोटी या नौकानयन स्पर्धा आणि कवायतीत सहभागी होतील.
आझादी का अमृत महोत्सव यॉटिंग कार्यक्रम मुंबई आणि विशाखापट्टणम येथे देखीलअनुक्रमे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत.
ZKUN.jpeg)
65J8.jpeg)
M.Iyengar/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1756784)
अभ्यागत कक्ष : 268