उपराष्ट्रपती कार्यालय

महिलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना त्यांच्या  पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी  सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या शंभराव्या  पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला श्री नायडू यांनी केले संबोधित

सुब्रमण्यम  भारती यांच्या काव्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना निर्माण झाली असे सांगत नायडू यांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 18 SEP 2021 9:24PM by PIB Mumbai

 

महिलांवरील सर्व प्रकारचे भेदभाव संपवण्याचे तसेच महिलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम.व्यंकय्या  नायडू यांनी आज केले.

संसद भवनात आज महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतानाभारतीय संस्कृतीने नेहमीच महिलांना देवत्वाचे प्रतीक म्हणून आदर दिला यावर उपराष्ट्रपतींनी जोर दिला. भारतियार यांच्या समानतेच्या दृष्टीकोनाचा हवाला देत, त्यांनी जाती, धर्म, प्रदेश, भाषा आणि लिंग यांच्या धर्तीवर समाजाला विभाजित करणारे सर्व अडथळे आणि भेदभाव दूर करण्याच्या गरजेवर भर दिला.

"तामिळनाडू आणि भारतातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करण्यात  सुब्रमण्यम भारती यांच्या  उत्स्फूर्त कविता आणि लेखनाने  महत्त्वपूर्ण भूमिका बजावली", असे उपराष्ट्रपती म्हणाले.

सांस्कृतिक आणि संसदीय कार्य राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल, महाकवी सुब्रमण्यम भारती यांचे पणतू डॉ. राजकुमार भारती आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

भाषणाचा संपूर्ण मजकूर.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756133) Visitor Counter : 175