आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 77.24 कोटीहून अधिक
गेल्या 24 तासात 63.97 लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या
देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.65%
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 34,403 नवे दैनंदिन रुग्ण
देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,39,056)ही आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.02%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.97%)गेले 84 दिवस 3% पेक्षा कमी
Posted On:
17 SEP 2021 10:27AM by PIB Mumbai
भारताने गेल्या 24 तासात 63,97,972 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 77.24 कोटीपेक्षा जास्त मात्रा (77,24,25,744)दिल्या आहेत. एकूण 77,78,319 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
HCWs
|
1st Dose
|
1,03,66,108
|
2nd Dose
|
86,55,036
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,41,064
|
2nd Dose
|
1,42,56,730
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
31,20,61,294
|
2nd Dose
|
5,05,68,273
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
14,69,74,803
|
2nd Dose
|
6,56,47,680
|
Over 60 years
|
1st Dose
|
9,48,63,636
|
2nd Dose
|
5,06,91,120
|
Total
|
77,24,25,744
|
देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 37,950 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,98,424
रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून बरे होण्याचा दर 97.65% झाला आहे.
सलग 82 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 34,403 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,39,056 आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.02% आहेत.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 15,27,420 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.92 कोटीहून अधिक (54,92,29,149) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.97% असून गेले 84 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.25% असून गेले 18 दिवस तो 3% पेक्षा कमी आणि गेले 101 दिवस तो 5% पेक्षा कमी आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755667)
Visitor Counter : 194