वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतातील घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची ऑगस्ट, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12)

Posted On: 14 SEP 2021 12:00PM by PIB Mumbai

वाणिज्य सल्लागार, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, यांचे कार्यालय भारतात घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची ऑगस्ट, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12), जाहीर करत आहे. या प्रसिद्धी पत्रकात ऑगस्ट, 2021ची प्राथमिक आकडेवारी असून जून, 2021 ची आकडेवारी अंतिम आहे. घाऊक किंमत निर्देशांक, (संदर्भ) महिन्यातील दोन आठवड्याच्या अंतराने तसेच संस्थात्मक स्रोतांकडून व देशभरातील निवडक उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (अथवा पुढच्या कामकाजाच्या दिवशी) जाहीर केला जातो. दहा आठवड्यानंतर अंतिम निर्देशांक जाहीर केला जातो आणि त्या नंतर तो गोठवला जातो. 

ऑगस्ट 2021 या महिन्यासाठी प्राथमिक वार्षिक महागाई दर 11.3% असून, ऑगस्ट 2020च्या तुलनेत 0.41% आहे. गेल्या वर्षी याच महिन्यातील दराच्या तुलनेत, खाद्येतर वस्तू, खनिज तेल, कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅस, मुलभूत धातू, खाद्य पदार्थ, वस्त्रे, रसायने आणि रासायनिक उत्पादने या सारख्या उत्पादनांच्या किमितीत वाढ झाल्याने, ऑगस्ट 2021मध्ये महागाईचा उच्च दर नोंदवला गेला.

 

चलनवाढ आणि घाऊक किमतीवर आधारित घटकांमध्ये  मागील तीन महिन्यामधील वार्षिक बदल पुढीलप्रमाणे

 

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %) *

All Commodities/Major Groups

Weight (%)

Jun-21 (F)

Jul-21 (P)

Aug-21 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100

133.7

12.07

134.5

11.16

135.9

11.39

I Primary Articles

22.6

153.0

8.59

153.4

5.72

155.8

6.20

   II Fuel & Power

13.2

110.7

29.32

114.3

26.02

116.0

26.09

   III Manufactured Products

64.2

131.6

10.96

132.0

11.20

133.0

11.39

Food Index

24.4

158.7

6.72

159.3

4.46

159.6

3.43

ऑगस्ट 2021 साठी घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकात मासिक बदल (जुलै, 2021 च्या तुलनेत) 1.04% होता. गेल्या सहा महिन्यात घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकात झालेले मासिक बदल खालील प्रमाणे आहेत: 

 

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Mar-21

Apr-21

May-21

Jun-21

Jul-21 (P)

Aug-21 (P)

All Commodities

100

1.41

1.62

0.68

0.60

0.60

1.04

I Primary Articles

22.62

0.20

2.78

-0.86

1.86

0.26

1.56

   II Fuel & Power

13.15

3.31

-0.27

0.83

0.82

3.25

1.49

   III Manufactured Products

64.23

1.51

1.56

1.23

0.08

0.30

0.76

Food Index

24.38

0.33

3.18

0.00

-0.06

0.38

0.19

 

प्रसिद्धी पत्रकाची पुढील तारीख: घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाचे सप्टेंबर, 2021 साठीचे आकडे 14/10/2021रोजी जाहीर केले जातील. 

 

अधिक माहितीसाठी कृपया इंग्रजी प्रसिद्धी पत्रक येथे बघावे.

***

Jaydevi PS/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754727) Visitor Counter : 282