कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2022-23 च्या रबी विपणन हंगामात मंजूर ठराविक रबी पिकांचे किमान आधारभूत मूल्य उत्पादन खर्चापेक्षा अधिक अथवा दीड पट

Posted On: 13 SEP 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2021 

 

गेल्या काही वर्षांत भारत सरकारची शेतकरी कल्याणाबाबतची धोरणे आणि निर्णय यांच्यामुळे, कोविड-19 महामारीच्या परिस्थितीत देखील देशातील धान्य उत्पादन आणि शाश्वत कृषी विकास यांच्यात सुधारणा झालेली दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या 8 सप्टेंबर 2021 ला झालेल्या बैठकीत 2022-23च्या रबी विपणन हंगामासाठी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला सर्व ठराविक रबी पिकांच्या किमान आधारभूत मूल्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.

किमान आधारभूत मूल्य हा कृषी मूल्य धोरणाचा अविभाज्य भाग असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे किमान मूल्य आणि ग्राहकांना किफायतशीर दरात धान्य मिळण्याची सुनिश्चिती होते. कृषीविषयक खर्च आणि मूल्य यासंदर्भातील महामंडळाने केलेल्या शिफारसीनुसार तसेच सर्व संबंधित राज्य सरकारे, केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांची मते जाणून घेऊन भारत सरकार दर वर्षी पेरणी हंगामाच्या सुरुवातीला  तृणधान्ये, डाळी, तेलबिया आणि इतर व्यापारी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित करते.

किमान आधारभूत मूल्य निश्चितीसाठी महामंडळ पीक उत्पादनाला आलेला खर्च, स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, मागणी-पुरवठा यांचे प्रमाण, अंतर-पीक मूल्य समानता, कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रांतील व्यापाराच्या अटी इत्यादी घटक विचारात घेते.

2022-23 च्या रबी विपणन हंगामासाठी मंजूर किमान आधारभूत मूल्य पीक उत्पादन खर्चापेक्षा अधिक किंवा उत्पादन खर्चाच्या दीडपट आहे. पीक उत्पादनासाठी आलेल्या खर्चापेक्षा शेतकऱ्यांना मिळणारा अपेक्षित परतावा काही पिकांच्या बाबतीत सर्वोच्च असेल असा अंदाज आहे, ती पिके पुढीलप्रमाणे- गहू (100%), मोहरी (100%), यांच्या खालोखाल पुढील पिकांना चांगला भाव मिळेल- मसूर (79%), हरभरा (74%), सातू (60%), करडई(50%).

Table 1: Minimum Support Prices for mandated Rabi crops for rabi marketing season (RMS) 2022-23:

₹/quintal

Crop

Cost* of production for RMS 2021-22

MSP for RMS 2021-22

Cost* of production for RMS 2022-23

MSP for RMS 2022-23

Increase in MSP for 2022-23

(Absolute)

Return over cost

(in per cent)

Wheat

960

1975

1008

2015

40

100

Barley

971

1600

1019

1635

35

60

Gram

2866

5100

3004

5230

130

74

Lentil

2864

5100

3079

5500

400

79

Rapeseed/ Mustard

2415

4650

2523

5050

400

100

Safflower

3551

5327

3627

5441

114

50

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* Refers to comprehensive cost which includes all paid out costs such as those incurred on account of hired human labour, bullock labour/machine labour, rent paid for leased in land, expenses incurred on use of material inputs like seeds, fertilizers, manure, irrigation charges, depreciation on implements and farm buildings, interest on working capital, diesel/electricity for operation of pump sets etc., miscellaneous expenses and imputed value of family labour.

Table 2. Status of increase in procurement through MSP for various crops over the years:

Crop

5 years from 2009-10 to 2013-14

Last 5 Years( 2016-17 to 2020-21)

Increase in Times

Qty in LMT

MSP Value (Rs in Crore)

Qty. in LMT

MSP Value (Rs in Crore)

Qty.

MSP Value

Paddy

2,495

2,88,871

3,449

6,02,156

1.38

2.08

Wheat

1,395

1,68,223

1,627

2,85,071

1.17

1.69

Pulses

1.52

645

112.63

56,798

74.18

88.08

Oilseeds

3.65

1,454

59.20

26,503

16.22

18.23

Cotton *

29.15

5821

211.65

59,094

7.26

10.15

 

Click Here for Detailed Presentation

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1754648) Visitor Counter : 405


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu