आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांची राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे असलेल्या उपलब्धतेची अद्ययावत माहिती


राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 66 कोटी 89 लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 4 कोटी 37 लाखांहून अधिक न वापरलेल्या मात्रा शिल्लक असून 1 कोटी 56 लाखांहून अधिक मात्रांचा लवकरच होणार पुरवठा

Posted On: 05 SEP 2021 9:28AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2021

देशभरात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी आणि मोहिमेची व्याप्ती विस्तारण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवी टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरू झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरूपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळी सुरळीत ठेवून लसीकरण मोहिमेचा वेग सध्या वाढविण्यात येत आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना सहकार्य करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75 % साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत) पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करीत आहे.

VACCINE DOSES

 

(As on 5 September 2021)

 

SUPPLIED

 

66,89,80,635

 

PIPELINE

 

1,56,96,450

 

BALANCE AVAILABLE

 

 

4,37,83,160

 

 

केंद्र सरकारकडून (मोफत पुरवठा पद्धतीने) आणि राज्यांकडून थेट खरेदीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 66 कोटी 89 लाखांहून अधिक (66,89,80,635) मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे आणि आणखी 1 कोटी 56 लाखांहून अधिक (1,56,96,450) मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 37 लाखांहून अधिक (4,37,83,160) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

***

MaheshC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752275) Visitor Counter : 153