आयुष मंत्रालय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतून 'आयुष आपके द्वार' मोहिमेचा केला आरंभ
औषधी वनस्पतींच्या रोपांचे केले वितरण: (Y-Break) वाय -ब्रेक शिष्टाचार पाळण्याचे केले आवाहन
Posted On:
03 SEP 2021 9:33PM by PIB Mumbai
मुंबई, 3 सप्टेंबर 2021
केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्याचा एक भाग म्हणून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला.
श्री सोनोवाल यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रासंगिकतेबद्दल बोलताना ते म्हणाले, "याद्वारे आपल्याला स्वातंत्र्य संग्रामादरम्यान स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची आपल्या तरुण पिढीला जाणीव करून द्यायची आहे''

काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या 5 मिनिटांच्या ‘योग ब्रेक प्रोटोकॉल’बद्दलही ते यावेळी बोलले. कामाच्या ठिकाणी व्यक्तींची उत्पादनशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने, तणाव कमी करण्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी योग ब्रेक प्रोटोकॉलचा सराव करण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले.

श्री सर्बानंद सोनोवाल यांनी नागरिकांना औषधी वनस्पतींची रोपे वाटून मुंबईतून 'आयुष आपके द्वार' मोहिमेचा आरंभ केला.आयुष मंत्रालयाने आज सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेचा हा एक भाग होता. या प्रसंगी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) आणि आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्र (सीसीआरए ), आयुष मंत्रालय देखील या कार्यक्रमाचा भाग होते.एनएमपीबीने औषधी रोपांचे वितरण केले आणि सीसीआरएने आयुर्वेदिक औषधांचे जनतेला वाटप केले.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मुंबई पोर ट्रस्टचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय बंदोपाध्याय, कर्करोगासाठीची केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, सीसीआरएसचे सहाय्यक संचालक डॉ. एम. सूर्यवंशी यांनीही या कार्यक्रमात आपले विचार मांडले. राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे उपसंचालक, डॉ. आर. मुरुगेश्वरन आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी देखील उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751869)
Visitor Counter : 241