रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
वाहनांच्या सुगम स्थलांतरणाकरिता केंद्र सरकारने सुरु केली भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी वाहन नोंदणी मालिका
Posted On:
28 AUG 2021 8:07AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 28 ऑगस्ट 2021
वाहनांचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावे यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, वाहनांच्या नोंदणीकरिता भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी नोंदणी मालिका सुरु केली आहे. या नव्या मालिकेची सुरुवात केल्यामुळे, वाहनाचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर, त्याच्या वाहनाचा आधीचा नोंदणी क्रमांक बदलून नव्या नोंदणी क्रमांकाच्या नेमणुकीची आवश्यकता उरणार नाही.
भारत मालिकेचा (बीएच-सिरीज) नोंदणी क्रमांक नमुना पुढीलप्रमाणे असेल -
नोंदणी क्रमांक नमुना:-
YY BH #### XX
YY – पहिल्या नोंदणीचे वर्ष
BH- भारत सिरीजचा सांकेतांक
####- 0000 to 9999 (यादृच्छिक आकडे)
XX- अक्षरे (AA ते ZZ)
संरक्षण विभागात कार्यरत व्यक्ती, केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्र तसेच राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या/ संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना ऐच्छिक तत्वावर “भारत मालिके” (बीएच-सिरीज)अंतर्गत वाहन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
या सुविधेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनांचे मोटार वाहन शुल्क दोन वर्षे किंवा त्याच्या पटीतील वर्षांकरिता आकारले जाईल. या नव्या सुविधेमुळे व्यक्तिगत मालकीच्या वाहनांना नव्या जागी कार्यान्वित व्हावयाची गरज भासल्यास, भारतातील कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मुक्तपणे स्थलांतरित होण्याची सोय झाली आहे. नव्या नोंदणीला चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर, वार्षिक तत्वावर मोटार वाहन शुल्क आकारण्यात येईल आणि ती रक्कम आधीच्या शुल्काच्या निम्मी असेल.
भारत मालिका नोंदणीविषयीचे तपशीलवार नियम :
GSR 594(E) 26 .08.2021 BH series registration mark Rules
****
SP/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749841)
Visitor Counter : 469