उपराष्ट्रपती कार्यालय

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशाला शुभेच्छा दिल्या

Posted On: 21 AUG 2021 7:01PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या नागरिकांना  शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे -

रक्षाबंधनाच्या शुभ दिवसानिमित्त मी देशातील नागरिकांना  शुभेच्छा देतो.

रक्षाबंधन आपल्या समाजातील बंधुभगिनीमधील प्रेम आणि आपुलकीच्या दृढ बंधनाची अभिव्यक्ती आहे. भावाबहिणीचे नाते अत्यंत खास आहे आणि एकमेकांप्रती  प्रेम, परस्पर आदर आणि ममत्वावर  आधारित या नात्याचा, बंधाचा सन्मान हा रक्षाबंधनाचा सण करतो. .

हा सण आपल्याला आपल्या समाजात पारंपारिकपणे महिलांना दिलेल्या उच्च स्थानाची आठवण करून देतो. या निमित्ताने आपण आपल्या देशात महिलांचा सन्मान आणि आदर राखण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित करूया.

रक्षाबंधनाच्या शुभ दिवसानिमित्त मी आपल्या देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो.

***

Jaydevi PS/S.Kakakde/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747890) Visitor Counter : 194