वस्त्रोद्योग मंत्रालय
तीन वर्षांच्या कालावधीत हातमाग उत्पादन दुप्पट आणि उत्पादनांची निर्यात चौपट करण्यासाठी सरकारकडून समिती स्थापन
समिती स्थापनेच्या दिवसापासून 45 दिवसांच्या आत अंतिम अहवाल सादर करेल
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2021 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021
आगामी तीन वर्षांच्या कालावधीत हातमाग उत्पादन दुप्पट आणि उत्पादनांची निर्यात चौपट करण्यासाठी 7 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) चे अध्यक्ष सुनील सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. यात महाराष्ट्रातील शेफाली वैद्य, अनघा घैसास , सुनील अलग या सदस्यांचा समावेश आहे.
समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे -
- विणकरांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने हातमाग उत्पादन दुप्पट करण्यासाठी आणि उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरणात्मक चौकट सुचवणे.
- डिझायनर्स, ग्राहक, संघटना आणि निर्यातदारांबरोबर हातमाग विणकर संस्थांची भागीदारी आणि सहकार्यासाठी मार्ग सुचवणे.
- हातमागाच्या उत्पादनांच्या निर्यातीत चौपट वाढीसाठी उपाय सुचवणे.
- देशांतर्गत बाजारात हातमाग उत्पादनांचे विपणन सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे .
- कच्चा माल, कर्जपुरवठा , तंत्रज्ञान सुधारणा, कौशल्य, डिझाइन इ.बाबी सुधारण्यासाठी उपाय सुचवणे
ही समिती आपल्या प्राथमिक शिफारशी 30 दिवसांच्या आत आणि अंतिम अहवाल समितीच्या स्थापनेपासून 45 दिवसांच्या आत सादर करेल.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1747681)
आगंतुक पटल : 255