गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू -काश्मीरमधील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये निर्धारित तारखेपूर्वी शुद्ध पेयजलाचा पुरवठा सुनिश्चित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

Posted On: 19 AUG 2021 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2021 

 

जम्मू -काश्मीरमधील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये निर्धारित  तारखेपूर्वी शुद्ध पेयजलाचा पुरवठा सुनिश्चित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे  आभार मानले आहेत.

 

ट्वीट्स संदेशात अमित शहा म्हणाले की, "नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर शांतता आणि समृद्धीचा पर्याय बनत आहे. जम्मू -काश्मीरच्या सर्व शाळांमध्ये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये निर्धारित वेळेपूर्वी नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानतो.

 

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, "यापूर्वीच्या सरकारांनी जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना अनेक दशके  विकासापासून वंचित ठेवले आणि केवळ आपल्या कुटुंबांची पर्वा केली. मोदींनी विकासाचे एक नवीन युग सुरू केले आहे जे गरीब नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडते आणि त्याचाच परिणाम आहे आज जम्मू आणि काश्मीर सर्व क्षेत्रात पुढे मार्गक्रमण करत  आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747462) Visitor Counter : 271