वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या बैठकीत सामाजिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (एनडीबी) क्षितिज विस्तारण्याची भारताकडून इच्छा व्यक्त


पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली "ब्रिक्स उद्योग मंत्र्यांची 5वी बैठक" संपन्न

Posted On: 18 AUG 2021 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज भारताच्या अध्यक्षतेखालील "ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या  बैठकीचे " अध्यक्षपद भूषवले.

भारताने यावर्षी अध्यक्षपदासाठी 'सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर ब्रिक्स सहकार्य' ही ब्रिक्स@15ची संकल्पना निवडली.

18 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या 5 व्या बैठकीत संयुक्त घोषणापत्र स्वीकारण्यात आले.

चांगल्या आणि स्मार्ट प्रशासनाच्या दिशेने तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. भारताने एक चैतन्यदायी आणि गतिशील स्टार्ट-अप परिसंस्था विकसित केली आहे, शेवटच्या घटकापर्यंत महत्वपूर्ण सेवा पोहोचवण्यासाठी सध्याच्या विविध मंचांचा आणि आधार आणि यूपीआय पेमेंट सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोवीन आणि डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र सारख्या ऑनलाइन प्रणालीकडे आज जगभरात यशोगाथा म्हणून पाहिले जात आहे.

या बैठकीत मंत्र्यांनी कोविड -19 महामारीचा  विशेषतः व्यापार आणि उद्योग क्षेत्रावर अभूतपूर्व प्रभाव पडल्याची दखल घेतली. 

वेगाने बदलणाऱ्या जगात उदयोन्मुख नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या गरजेचे त्यांनी कौतुक केले आणि उद्योगाचे आधुनिकीकरण आणि परिवर्तन, सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितले. यामुळे ब्रिक्स राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होत आहे.

त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) सोबत सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. भारताने एनडीबीचे क्षितिज विस्तारण्याची आणि संसाधनांचा उपयोग औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी करण्याची इच्छा व्यक्त केली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1747214) Visitor Counter : 251


Read this release in: English , Urdu , Hindi