अर्थ मंत्रालय

आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन) बाजाराची प्रायोगिक तत्वावर सुरुवात- सोनेचांदी (बुलियन) आयातीसाठीचा मार्ग

Posted On: 18 AUG 2021 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाचे प्रमुख इंजेती श्रीनिवास यांनी आज नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन) बाजाराच्या प्रायोगिक तत्वावरील सेवेला सुरुवात केली. प्राधिकरणाच्या स्थापना दिनाला म्हणजे 1 ऑक्टोबर 2021रोजी हा बाजार पूर्णपणाने कार्यरत होईल.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेबरहुकूम, 11 डिसेंबर 2020 रोजी सोनेचांदी (बुलियन)  बाजार मंजुरी महामंडळ, डीपॉझिटरी आणि व्हॉल्ट्स यांच्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (सोनेचांदी (बुलियन)  बाजार) नियम 2020 सूचित करण्यात आले. सरकारने बुलियन स्पॉट व्यवहार आणि बुलियन डीपॉझिटरी पावत्यांसह बुलियन हे आर्थिक उत्पादन आणि सोन्याचांदीशी (बुलियन) संबंधित सेवांना आर्थिक सेवा म्हणून सूचित करण्यासाठी देखील पावले उचलली आहेत.  

आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन)  बाजार हा “भारतात सोनेचांदी (बुलियन) आयातीचा मार्ग” असेल आणि देशांतर्गत व्यवहारांसाठी होणारी सर्व आयात या बाजाराद्वारे कार्यान्वित होईल. बाजार परिसंस्था बाजारातील सर्व सहभागींना सोनेचांदी (बुलियन) व्यवहारांसाठी सामायिक पारदर्शक मंचावर आणेल आणि योग्य किंमत, सोन्याच्या दर्जाबद्दल खात्री पुरवून आर्थिक बाजारातील इतर घटकांमध्ये अधिक उत्तम एकात्मता शक्य करेल तसेच जगात सोन्याचांदीचे प्रमुख व्यवहार केंद्र म्हणून भारताची जागा प्रस्थापित करेल.  

राष्ट्रीय शेअर बाजार, एमसीएक्स, इंडिया आयएनएक्स आंतरराष्ट्रीय बाजार (आयएफएससी) मर्या., राष्ट्रीय सिक्युरिटी डीपॉझिटरी मर्या., मध्यवर्ती डीपॉझिटरी सेवा मर्या., यांच्या दरम्यान सामंजस्य करार झालेला असून  इंडिया इंटरनॅशनल सोनेचांदी (बुलियन) होल्डिंग  आयएफएससी मर्या. या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी आयएफएससी गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन)  बाजार, सोनेचांदी (बुलियन)  मंजुरी महामंडळ आणि सोनेचांदी (बुलियन) डीपॉझिटरीची उभारणी करणार आहे.

आयएफएससीएने होल्डिंग कंपनीकडून आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन)  बाजार उभारणीसाठीचा आलेला अर्ज होल्डिंग कंपनीच्या “आंतरराष्ट्रीय सोनेचांदी (बुलियन) बाजार आयएफएससी मर्या.” या उपकंपनीच्या माध्यमातून मंजूर केला असून त्यात बुलियन बाजार आणि बुलियन मंजुरी महामंडळाचा समावेश आहे.

सोनेचांदी (बुलियन) डीपॉझिटरी म्हणून सीडीएसएल-आयएफएससी या परदेशी डीपॉझिटरी कंपनीवर व्हॉल्ट व्यवस्थापक व्यवहार सांभाळण्यासाठी सोनेचांदी (बुलियन) बाजाराची जबाबदारी देण्यात आली आहे. 

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747175) Visitor Counter : 251


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil