गृह मंत्रालय

आपत्तीचे व्यवस्थापन, पुनर्बांधणी आणि सुधारणा या क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 18 AUG 2021 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्‍ट 2021

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), गृह मंत्रालय, भारत  आणि  बांग्लादेशच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत मंत्रालय यांच्यात मार्च 2021 मध्ये आपत्ती व्यवस्थापन, लवचिकता आणि तीव्रता रोखण्यात सहकार्यासंबंधी  सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.

 

फायदे:

या सामंजस्य करारामध्ये एक यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे  ज्याद्वारे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना परस्परांच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा फायदा होईल आणि यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सज्जता, प्रतिसाद आणि क्षमता वाढवण्याची क्षेत्रे मजबूत होण्यास मदत होईल.

 

सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये:

  1. मदत, प्रतिसाद, पुनर्बांधणी आणि सुधारणा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आपत्ती (नैसर्गिक किंवा मानव प्रेरित) त्यांच्या संबंधित प्रदेशात उद्भवलयास  दोन्ही पक्षांच्या विनंतीनुसार  परस्पर सहकार्य पुरवणे.
  2. संबंधित माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा आणि इतर वैज्ञानिक डेटाची देवाणघेवाण  आणि आपत्ती प्रतिसाद, सुधारणा , तीव्रता रोखणे, लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी क्षमता वाढवणे आदीच्या  अनुभव/सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे.
  3. प्रगत माहिती तंत्रज्ञान, पूर्वसूचना प्रणाली, रिमोट सेन्सिंग आणि दिशादर्शक  सेवा आणि आपत्तीची तयारी, प्रतिसाद आणि शमन आणि अधिक रिअल टाईम डेटा सामायिकीकरणासाठी  कौशल्य क्षेत्रात सहकार्य वाढवणे .
  4. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला मदत करणे  .
  5. दोन्ही देशांदरम्यान  संयुक्त आपत्ती व्यवस्थापन सराव   आयोजित करणे .
  6. आपत्ती प्रतिरोधक यंत्रणा  तयार करण्यासाठी मानके, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधने सामायिक करणे .
  7. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील मार्गदर्शक तत्त्वे आणि पाठ्यपुस्तके म्हणून प्रकाशने आणि साहित्याची देवाणघेवाण आणि आपत्ती व्यवस्थापन, जोखीम कमी करणे आणि सुधारणा क्षेत्रात संयुक्त संशोधन उपक्रम आयोजित करता येईल.

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747031) Visitor Counter : 267