वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतात गेल्या 7 वर्षांत पेटंट्च्या मान्यतेत 572% वाढीची नोंद


2013-14 मधील 4,227 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 28,391 पेटंट्सला मान्यता

पीयूष गोयल यांच्या हस्ते राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार 2020 प्रदान

Posted On: 17 AUG 2021 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021

वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज एका कार्यक्रमात विजेत्यांना राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार  2020 प्रदान केले.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव डॉ. गिरिधर अरामाने आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना गोयल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आणि भविष्यातही ते अशी अनुकरणीय कामे करत राहतील अशी आशा व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रापासून ते स्टार्ट अप्स पर्यंत विविध क्षेत्रातील योगदानासह हे पुरस्कार खरोखरच सर्वसमावेशक होते,असे ते म्हणाले.

मंत्री म्हणाले की, आज तंत्रज्ञान आणि विविध कल्पना ही विकासाची दुहेरी  इंजिन आहेत,बौद्धिक संपदा हक्क हे त्यांना ऊर्जा पुरवणारे इंधन आहे. आणि हा पुरस्कार केवळ व्यक्ती आणि संस्थांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनाच मान्यता देत नाही तर इतरांसाठी प्रेरणा म्हणून काम करतो.ते म्हणाले की, देशात सर्वसमावेशक प्रगती आणि बौद्धिक संपदा हक्क कायदे बळकट करण्यासाठी बौद्धिक संपदा क्रांती आणण्याची गरज आहे यामुळे रोजगार निर्मिती, गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि उत्पादन वाढेल,असे ते म्हणाले . 

या कार्यक्रमाला संबोधित करताना गोयल म्हणाले की, यांनी खालील महत्वाच्या कामगिरीचा उल्लेख केला.

  • 2013-14 मधील 4,227 पेटंट्सना  मान्यता दिल्याच्या तुलनेत 2020-21 मध्ये 28,391 पेटंटला मान्यता (572% वाढ.)
  • पेटंट परीक्षणासाठी असलेला वेळ  डिसेंबर 2016 मध्ये असलेल्या 72 महिन्यांपासून  डिसेंबर 2020 मध्ये 12-24 महिन्यांपर्यंत कमी करणे
  • 75 वर्षांदरम्यानच्या  (1940-2015) 11 लाखांच्या तुलनेत 4 वर्षांमध्ये (2016-2020) 14.2 लाख ट्रेडमार्कची  नोंदणी.

गोयल म्हणाले की, आपण 2020 मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताची क्रमवारी सुधारली असून या क्रमवारीत भारताचे स्थान 48 वर आणले आहे. (2015-16 मधील 81 व्या क्रमांकावरून 33 स्थानांनी झेप) मंत्री म्हणाले, आता आपण सर्वांनी जागतिक नवोन्मेष निर्देशांकात अव्वल 25 देशांमध्ये स्थान मिळविण्याचे  महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट  साध्य करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे.

भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले की, मोटारीपासून  संगणकापर्यंत आणि शिवणकामाच्या यंत्रांपासून ते अंतराळ यानापर्यंत, आपण सर्वांना मानवतेच्या चांगल्या भविष्याची रचना करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ते म्हणाले की आपल्या बौद्धिक संपदेच्या कार्यक्षेत्राला अधिक निष्णात बनवण्यासाठी आपण सर्वांनी नव कल्पनांचे योगदान देणे आवश्यक आहे.

पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746791) Visitor Counter : 257


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali