आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 लसीकरणाबाबत ताजी माहिती


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 56.81 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरवण्यात आल्या

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.89 कोटी पेक्षा जास्त मात्रा उपलब्ध

Posted On: 16 AUG 2021 10:22AM by PIB Mumbai

कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाची देशभरात व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसींची अधिक उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लस उपलब्धतेवर आधीच दृष्टीक्षेप आणि प्रवाही लस पुरवठा साखळी याद्वारे लसीकरण अभियानाला अधिक गती देण्यात आली आहे.

देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.

 

VACCINE DOSES

 

(As on 16 August 2021)

 

SUPPLIED

 

56,81,14,630

 

CONSUMPTION

 

54,22,75,723

 

BALANCE AVAILABLE

 

 

2,89,47,890

केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व स्त्रोताद्वारे 56.81 कोटींहून अधिक (56,81,14,630) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.आणखी

वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 54,22,75,723 मात्रा देण्यात आल्या आहेत.(आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार)

याशिवाय लसीच्या 2.89  कोटी हून अधिक (2,89,47,890)  शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.

***

UU/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1746266) Visitor Counter : 339